प्रा.रामेश्वर बद्दर
आगामी लोकसभा निवडणुक लढविण्यास मी इच्छुक आहे असं मत माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला दैनिक मराठवाडा नेताशी बोलताना व्यक्त केले. डॅा. माधवराव पाटील किन्हाळकर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मुल्याधीश राजकारणी, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न करणारे, मंत्री पदाच्या काळात आगळा आणि वेगळा ठसा निर्माण केलेेले राजकारणातील बुद्धीवंत नांदेड जिल्ह्यात चार तालुक्याची निर्मीती करण्यास पुढाकार घेतलेले एम.बी.बी.एस., एम.एस. हा अभ्यासक्रम पुर्ण करून पाच वर्ष नांदेड येथील सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेेले, टेबल टेनिस असोसिएशनमध्ये सक्रीय असलेले नांदेड येेथे रामदेवबाबा यांचे योग शिबीर घेतलेले ज्यांना वाचन खेळ आणि व्यायाम हे आवडीचे विषय असलेले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भुजंगराव किन्हाळकरांचे ते सुपूत्र आहेत. त्यांनी पेडन्युज व ईव्हीएम संदर्भात संघर्ष केलेला आहे. आपल्या जीवनात निर्भयपणाने निर्धाराने अभ्यास करून कार्य करण्याच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय आहेत. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमीत्त ही मुलाखात आम्ही प्रकाशित करत आहोत. त्याचे असे मत आहे, तत्वशुन्य राजकारण, नितीशुन्य व्यवहार, विवेकशुन्य उपभोग, श्रद्धेविना भक्ती, अध्यात्माविना विज्ञान व श्रमाविना पैसा व चारित्र्याविना ज्ञान हे जेव्हा वाढते तेव्हा समाज, राज्य आणि राष्ट्र देशोधडीला लागतो. म्हणून लोकांचा विवेक जागृत करून लोकशाहीत जबाबदारीची जाणीव करून काम करणं व काळाच्या ओघात प्रवाह पथीत न होता जीवन जगणं हे कृतीतून सिद्ध करणारे व्यक्तीमत्व आहे. अनेक वेळा त्यांच्याशी भेटण्याचा, बोलण्याचा योग आला. त्यावेळा प्रकर्षाने असं जाणवतं की, डॉ.माधवराव पाटील ही एक राष्ट्रीय संपती म्हणून समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी हे नेतृत्व सामाजिक गरज म्हणून जतन करणं गरजेचे आहे. म्हणून त्यांच्याशी झालेला संवाद आज आम्ही प्रकाशित करत आहोत. संपादक
दैनिक मराठवाडा नेताशी बोलताना डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर म्हणतात की, माझ्या जन्मदिनानिमीत्त आपण मला शुभेच्छा देत आहात. मी आपला आभारी आहे. गेली पंचवीस ते तीस वर्ष सार्वजनिक हिताचे काम करत असताना वाढदिवस साजरा करणं हे मला मुळात आवडत नाही. पण कार्यकर्ते, सहकारी, मित्र यानिमीत्ताने भेटत असतात. अभिष्टचिंतन करत असतात. आणि यावेळा मागे वळून पाहत असताना लक्षात येतं. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात अनेक परिवर्तने झाली. मी शिक्षण घेत असतानाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती मध्यंतरीचा काळ व आजचा काळ याचं चिंतन गरजेचं आहे.
एकीकडे आधी भौतिक सुखाची वाढ होत असताना होणारी वेगवेगळी परिवर्तन पुर्वीच्या काळात असलेल्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. मोठ्या प्रमाणात आर्थिक दारिद्र्य होतं. शैक्षणिक आरोग्य सुविधांचा अभाव होता. दळण वळणाच्या सोयी फार कमी होत्या. पायाभुत सुविधांचा विकास नव्हतां. शिक्षणाचा विस्तार नव्हतां. मध्यंतरीच्या काळात अभावग्रस्त परिस्थितीत जे बदल होत गेले. ज्यात परस्पराविषयी विश्वास, एकमेकांना सहकार्य करण्याची भुमिका व जीवनात आनंद घेण्याचा विचार करत असताना बर्याच वेळा भौतिक सुख, सुविधा व उंचावलेल्या आर्थिक जीवनाचा स्तर व वाढत चाललेली विषमता, लोकसंख्या व परस्परातील कमी होत असलेला विश्वास, स्नेह, आपुलकीची भावना ही लोप होत आहे. याला विकास म्हणावा की अधोगती म्हणावी याच्या बद्दल मला प्रश्न निर्माण होतो, असंही माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर म्हणतात.
आज सर्वच क्षेत्रात ज्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक किंबहूना विविध क्षेत्रात बाजारू वृत्ती वाढत आहे. आपल्या मनाचा ताबा घेतला पाहिजे. नैतिकतेचे अधिष्ठाणला फारकत होता काम नये, हे सांगत असताना मानवाने अंतिमता सुखी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी मुल्य पाळणं गरजेचे आहे. आणि ज्यामुळे समाजात विश्वासाचा अभाव वाढतोय. नैराश्याने ग्रासलेला समाज मन पाहत असताना प्राप्त परिस्थितीत आजची आव्हाने वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत.
नैराश्याला छेद देणे गरजेचे
माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील म्हणतात की, मी सात वेळा विधानसभा निवडणुक लढविली. त्यापैकी दोन वेळा विजयी झालो. वयाच्या 33 व्या वर्षी आमदार झालो. 36 व्या वर्षी मंत्री झालो. आणि दोन वर्षात मंत्री म्हणून जे काम केले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. दुदैवाने समाज मनात वाढत चाललेलं नैराश्य याला छेद द्यायचा असेल तर संतांनी सांगितल्याप्रमाणे क्रियाशील विचारवंतांनी जे वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यात नितीमान जीवन जगण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मी आज पदावर नाही. मी पुढे पदावर येईल या सर्व गोष्टींचा विचार करत असताना माझ्या राजकारणाच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. बहुतांश मंडळी आपले वेगळे उद्दीष्ट ठेवतात. समाजाचा राष्ट्राच्या विकासाऐवजी स्वत:चा आणि आपल्या मित्र मंडळींचा विकास कसा होईल हे पाहतात. जेव्हा हे घडत तेव्हा आपण चुकीच्या दिशेने जात असतो. म्हणून आपली ध्येय धोरणं हे महत्वाची आहेत. ते आपले शक्ती केंद्र असतात. आणि ते शक्ती केंद्र सक्रीय करण्यासाठी पक्षीय संघटना व त्या संघटनेचा आश्रय गरजेचा असतो. आणि हे करत असताना निराश हताश झालो नाही. रागावलो नाही, असंही डॉक्टर म्हणाले.
सत्ता मिळाली म्हणजे प्रशासनाचे अधिकार मिळतात, कायद्याने अधिकार प्राप्त होतात व आर्थिक बळ मिळते आणि सामाजिक प्रगती करता येवू शकते आणि लोकशाही व्यवस्थेत राजकारणाची कास धरत असताना राजकारणातील नितीमुल्य पाळणे महत्वाचे असते.सामजिक विषमता, बाजारीकरण काही जणांची हीच ताकद असते. मेजॉरेटीने विषमतेमुळे आत्महत्या होतात. शेतकरी हजारो आत्महत्या का करतात कारण राजकारणाचा पोत बिघडत चाललाय.
महात्मा गांधींचे विचार
महात्मा गांधी म्हणत होते. तत्वशुन्य राजकारण, नितीशुन्य व्यवहार, विवेक शुन्य उपभोग, श्रद्धेविना भक्ती, अध्यात्माविना विज्ञान, श्रमाविना पैसा, चारित्र्याविना ज्ञान यासाठी होड लागली आहे. ती व्यक्तीला कु्रर बनवते. आणि कु्रर नेत्यांमुळे समाज, राज्य देशोधडीला लागते.
राजकारणाचे तत्व, व्यवहार व उपभोग याचा विचार करत असताना विज्ञानात अध्यात्म हवे पण श्रमाविना मिळणारा पैसा तो उधळत राहतो. आणि विसरून जातो. समजाला चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे हे विसरून लोकांचा विवेक नष्ट करण्याचे पाप चालु आहे. पैशाचा वापर करत असताना शिक्षणातून चारित्र्य निर्माण नाही झाले तर ते शिक्षण काय कामाचे आणि अशा परिस्थितीत खर्या अर्थाने महात्मा गांधींच्या विचाराची आज आवश्यकता आहे. संपुर्ण समाजात विवेक निर्माण झाला पाहिजे. साधन सुचितेचा आग्रह धरला नाही तर लोकांना विवेक भ्रष्ट करणे, स्वत: विवेक भ्रष्ट होणे ज्यामुळे समाजाचे नुकसान होते. म्हणून सताकारण करत असताना विवेकाची कास धरलीच पाहिजे हे माझे मत आहे. मला सत्ता मिळाली नाही म्हणून मी सतेसाठी चुकीच्या गोष्टी करणार नाही. लोकशाहीत सर्वात जास्त जबाबदारी ही जनतेची आहे. त्यात आपण सर्वजण येतो. आपल बेजबाबदार वागणं हे परवडणारं नाही. जिथे असाल तिथे क्षमतेने असायला हवं, विवेक सद्बुद्धी जागृत ठेवून समाज मन व राष्ट्रभक्त निर्माण झाले पाहिजे. यासाठी जबाबदार घटकांनी विवेकशील व्यक्ती तयार करून चांगल्या गोष्टी कराव्यात व सार्वजनिक जीवनात नेते मंडळीने स्वत:च्या कृतीकडे पहावे. आजुबाजूच्या वातावरणात परिवर्तन झाले असतील तर वेळीच दुरूस्त करून चांगल्या अर्थाने चांगल्या गोष्टीची वाढ होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. काळाच्या ओघात प्रवाह पथीत होेेणे व लोकांत पुढारपण करणार्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण लोक सार्वजनिक जीवनात जनता नेत्यांच्या वर्तनाकडे बघुन अनुकरण करत असते. यावेळा डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी हताश अर्जुनाला जे विचार सांगितले व सांगितलं की, समोरच्या बाजुला आप्तेष्ठ नातेवाईक असताना व्याकुळ मनाला कृष्णाने सांगितले. समोरचे लोकाविरूद्ध तुला शस्त्र घ्यावेच लागणार आहे कारण तु माझ्याकडे पहा माझ्याकडे कोणत्याही गोष्टीचा कमतरता नाही. तरीही तुच झोपल्यानंतर तुझ्या घोड्याचा मी खरारा रात्री करत असतो. हे लक्षात घे. लोक हे वरिष्ठांचे अनुकरण करत असतात. आणि अशा परिस्थितीत चुकीच्या परिस्थितीत योग्य गोष्टी करणे गरजेचे आहे. 1985, 90, 95, 99, 2004, 2009, 2014 या मी निवडणुका लढल्या. निवडणुका हे एक माध्यम आहे. चांगल्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करणारं. निवडुण येणारी मंडळी माझ्या शंभर पट खर्च करत होते. पण निस्पृह वृत्तीची माणसं अपमान सहन करून काम करत असतात हे सांगत असताना ते म्हणाले, गन इज इन्पॉर्टटंट बट मॅन इज मोस्ट इंपॉर्टटंट आणि गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत चुकीच्या पद्धतीने निवडणुका होणार असतील, पावित्र अबाधित राहणार नसेल, पैसा, दारू, पॅकेज यावर जर निवडणुका होणार असतील तर आपणाला शत्रु राष्ट्राची गरज नाही. ती प्रवृत्ती शत्रु बनत असते. राष्ट्रप्रेम, प्रामाणिक, इमानदार, जनसमुहावर उभा राहत असते. नितीभ्रष्ट, अनैतिक मार्ग हा राष्ट्राला रसातळाला नेणार आहे. हे सांगत असताना त्यांनी 2004 व 2008 यावेळा अपक्ष निवडणुका लढविल्या. मी केलेले कार्य हे कार्यातून मी समाधानी आहे. कारण ज्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली. त्यांच्या कितीतरी पटीने मी काम केले. निवडणुकांचे यश हे लोकांचे प्रेम आपली स्नेह आणि विवेकातून मिळायला हवं. तर लोकांसाठी आपण साधनं वापरून लोकाभिमुख कार्य करू शकतो. उलट पक्षी जेव्हा नको त्या मार्गाने लोकांना भ्रष्ट करून सता हस्तगत करतो तेव्हा लोकहिताची कामे करण्याची प्रेरणा गमावलेली असते. आणि यातूनच राष्ट्र हे देशोधडीला लागते. आणि यावेळा किन्हाळकर म्हणाले अपुज्या यत्रम पुज्यते
पुज्य पुजा यती क्रमह: सत त्रिणी वर्तने ते दुर्भीषम मरनम भयम हे सांगून डॉ. किन्हाळकर म्हणाले की, जेव्हा पुज्यनीय लोकांची पुजा ते क्रमश: कमी होते. तेथे तीन गोष्टी घडतात. एक दुर्भीक्ष, भयाचे संकट व साक्षात मृत्यू येतो. माझी स्वत:ची इच्छा, माझं वय, माझे अनुभव लक्षात घेता लोकसभा निवडणुक लढण्याची आहे, असंही यावेळा माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर म्हणाले.
महत्वपुर्ण कार्य
मी मंत्री व आमदार असताना सिंचनाचे दोन मोठे प्रकल्प मंजूर केले. ज्यात सुधा बृहद लघु सिंचन प्रकल्प, बाभळी बॅरेज मोठ्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढले. त्याचप्रकारे उंबरी 132 केव्ही प्रकल्प, तीनही माथुळ, करखेली 33 केव्ही प्रकल्प तसेच उंबरी, धर्माबाद, नायगाय, अर्धापूर हे तालुके केले. भोकर नगरपंचायत केली. अप्पर पैनगंगा प्रकल्पाचा उजवा कालवा 68 ते 125 किलोमीटर पुर्ण केला. नांदेड जिल्ह्यात 110 माध्यमिक शाळांचा बृहद आराखड्यास मंजूरी दिली. भोकर, धर्माबाद येथे ग्रामीण रूग्णालयास मंजूरी दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे 1990 पर्यंत भोकर येथे महाविद्यालय नव्हतं तर स्व. डिगांबरराव बिंदु यांच्या नावाने सुरू केलं. मराठवाडा विद्यापीटाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मंजूरीस्तव प्रयत्न केेले. भोकर रिंग रोड माती काम सुरू केले, अनेक सिंचन प्रकल्प मंजूर केले आणि वयाच्या 33 व्या वर्षी आमदार आणि35 व्या वर्षी मंत्री झालो. एमबीबीएस, एम.एस अंबाजोगाई येथून केले. नांदेड येथे पाच वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. वैधानिक कपास संस्थेचा सदस्य गोविंदसिंग इंजिनिअरीग कॉलेजचा संचालक, परभणी कृषि विद्यापीठाचा कार्यकारी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून कार्य केले. ऑल इंडिया इंटर मेडीकल क्रिकेट खेळलो, रामदेव बाबांचे योग शिबीर आयोजन करण्यात सुर्यकांता पाटलांना साथ दिली. इव्हीएम मशीन व पेड न्युज संदर्भात संघर्ष केला हे सांगत असताना माझे वडील भुजंगराव पाटील हे ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी होते. शंकररावजी चव्हाण यांचे समर्थक होते. पदमश्री कदम यांच्या सोबत त्यांनी काम केले. तसेच विविध विकास कामे केली.
दिवसेंदिवस राजकारणाचे अर्थकारण होत असताना मुल्याधिष्टीत कार्य करत असताना डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व्याख्यानाच्या निमीत्ताने जात असतात. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातुन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्य घडावे हीच शुभेच्छा. डॉ. माधवराव पाटील हे आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या कार्याची पद्धत त्यांची अभ्यासू वृती, इतिहास, विज्ञान, अध्यात्म याचा त्यांचा अभ्यास पाहता महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात एक चांगला सर्जन डॉक्टर योग्य शस्त्रक्रिया करण्यासाठी संसदेत गरजेचे आहे, असं आम्हाला वाटतं. त्यांना आजच्या दिवशी कोटी-कोटी शुभेच्छा.
No comments:
Post a Comment