लातूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने लातूर येथे प्रतिभा संगम हे राज्य स्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. दोन दिवस चालणार्या या संमेलनानिमित्त शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयापासून सुरू होणार्या या ग्रंथदिंडीचा दयानंद सभागृह येथे समारोप होणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेल्या दोन दशकापासून प्रतिभा संगम हे विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. या संमेलनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व नामांकित साहित्यांचा सहभाग लाभत आहे. यावर्षी या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन लातूर येथे दि. 29 व 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. या संमेलनात हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व परिक्षक सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी शहरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
बसवेश्वर महाविद्यालयापासून सुरू होणार्या या ग्रंथदिडीचे उद्घाटक जिल्हाधिकारी जी श्रीकांत असून यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महापौर सुरेश पवार, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, उपमहापौर देविदास काळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश ठक्कर, कार्याध्यक्ष रमेश कराड, अधिवेशनाचे निमंत्रक प्रसाद जाधव, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत साठे यांची उपस्थिती राहणार आहे.
बसवेश्वर महाविद्यालयापासून सुरू होणार्या या ग्रंथदिंडीचा समारोप दयानंद सभागृह येथे होणार आहे. या ग्रंथदिंडीत शहरातील ग्रंथप्रेमी, साहित्यिक, नाट्यकर्मी, कलावंत यांच्यासह लातुरकरांनी जास्तीत जास्त संख्येने लातूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिवेशनच्या स्वागत समितीचे सचिव गुरुनाथ मगे, अ.भा.वि.प.चे महानगराध्यक्ष संदीपान जगदाळे, महानगर मंत्री प्रमोद माचबोने यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment