ना. पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याने कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा

Wednesday, September 26, 2018

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी


मुंबई, दि.२५..राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट-क तांत्रिक या पदाचे रुपांतरण करुन त्याला आता राज्य शासनाकडील कृषी विभागात कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट-ब (कनिष्ठ) राजपत्रित या पदाचा नवीन संवर्ग निर्माण करुन या संवर्गास राजपत्रित दर्जा देण्यात आला, आणि आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट-ब (कनिष्ठ) राजपत्रित हे यापुढे राज्य सरकारी कर्मचारी असतील, त्यांना राजपत्रित दर्जा असेल. त्यांची आस्थापना राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारीत राहील. त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात करण्यात येईल. पदोन्नती कृषी विभागाच्या सध्या प्रचलित असलेल्या नियमानुसार करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) हा संवर्ग रद्द करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी वर्ग-३ या संवर्गाची पदे संपुष्टात आल्यावर त्यांच्यासाठी असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवेतील पदोन्नतीच्या पदावर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (कृषी) हे पदोन्नतीस पात्र होणार आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी ना. पंकजा मुंडे यांचे मानले आभार
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठपूरावा करुन पदोन्नतीचा मार्ग सुकर केला. तसेच राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देवून सन्मान वाढविला व होणारा अन्याय दूर केल्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांकडून ना. पंकजा मुंडे यांचे आभार मानन्यात आले.

No comments:

Post a Comment