जेटली यांची रजा संपली अर्थमंत्री म्हणून पुन्हा रुजू

Friday, August 24, 2018

नवी दिल्ली : मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन अरुण जेटली पुन्हा मोदी सरकार मध्ये रुजू झाले .केंद्रीय अर्थमंत्री पदाचा पदभार असताना जेटली यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सुट्टी घेऊन पियुष गोयल यांच्याकडे तो देण्यात आला होता .गुरुवारी पुन्हा अर्थमंत्री म्हणून रुजू होताना गोयल यांच्याकडून जेटली यांनी पदभार स्वीकारला .

पदभार स्वीकारताना अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जेटली यांनी लगेचच केंद्रीय अर्थसचिव हसमुख अढिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली .जेटली यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्यारोपणानंतर १०० दिवस विश्रांती घेतली आहे .असे असले तरी संसर्ग होऊ नये यासाठी पुढील काही दिवस जनसंपर्क कमी ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे .त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे .अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment