घाबरू नका !बॅंका सुरू आहेत

Friday, August 31, 2018

मुंबई : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवघे दोन दिवसच बँका सुरु राहणार आहेतआणि नंतर सलग आठ दिवस बॅंक बंद राहणार आहेत अशी बातमी खोटी आहे . घाबरायचं कारण नाही साप्ताहिक सुट्या वगळता बॅंका सुरू राहणार आहेत .

बँकांशी संबंधीत कामे असल्यास ती शनिवारपर्यंत उरकून घ्यावी, अशी अफवा आज सोशल मिडियात पसरली होती . मात्र, ही अफवाच असल्याचे उघड झाले. 

सप्टेंबरच्या सुरुवातीला 2 तारखेला रविवार आहे. यानंतर 3 सप्टेंबरला जन्माष्टमीमुळे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी पेन्शन आणि अन्य मुद्द्यांवर दोन दिवसांचा संप पुकारला आहे. म्हणजे 4 आणि 5 तारखेला संपामुळे बँकेचे कामकाज होणार नाही. यानंतर 6 आणि 7 तारखेला बँकांचे कामकाज चालेल. पुन्हा दोन दिवसांची सुटी असल्याचा संदेश गुरुवारी सकाळपासूनच समाजमाध्यमांवर फिरत होता. 

मात्र, फक्त रविवारीच सुटी असून जन्माष्टमीची सुटी नसल्याचे बँकेच्या सुत्रांनी सांगितले. संपही पुकारलेला नाही. यामुळे या दोन दिवशीही बँका सुरुच राहणार आहेत. ही निव्वळ अफवा आहे. पुढील आठवड्यात बँका कामकाजाचे सर्व दिवस सुरुच राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment