बीड /प्रतिनिधी :नोटाबंदीचा निर्णय चुकला तर मला चौकात बोलावून शिक्षा द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते. दोन वर्षानंतर हा निर्णय फसला असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे त्याना चौकात बोलावून शिक्षा द्या असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले .राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .
नोटाबंदीला मी सर्वप्रथम विरोध केला होता .माझे अंदाज खरे ठरतात .त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. रिझर्व बॅंकेने सर्व नोटा जमा जेल्यानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे लक्षात येत आहे .त्यामुळे जनतेने आता मोदीना पत्र पाठवून शिक्षा भोगण्यासाठी कोणत्या चौकात येता याची विचारणा केली पाहिजे
एकत्र निवडणूका घेण्याच्या निर्णयावरही ठाकरेनी टीका केली .पराभव होणार असल्याचे लक्षात आल्यानेच भाजपा एकत्र निवडणूका चा आग्रह करीत आहे .एव्हीएम मशिन मुळे भाजपा विजयी होतो .त्यामुळे यापुढे मतपत्रिकाद्वारे निवडणूका घेण्याचा आग्रह प्रत्येक पक्षाने धरला पाहिजे असेही ठाकरे म्हणाले . निवडणूका एकत्र झाल्या आणि त्रिशंकू झाले तर पुन्हा निवडणूका घेणार का ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला .
माझे ठोकताळे खरे ठरतात त्यानुसार नरेंद्र मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
नोटबंदीला पहिला विरोध मी केला
मी गेल्या अनेक दिवसांपासून नोटबंदी विरोधात बोलत आहे. नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरोध करणारा मी एकमेव नेता होतो. आणि आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसली हे स्पष्ट आहे, आता मोदी कोणत्या चौकात येणार आहेत, तुम्ही आमच्या चौकत येता की बाजूच्या हे देशाने मोदींना विचारले पाहिजे.
एकत्र निवडणुका कशासाठी
. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ' एकत्र कशासाठी, तुमचे होऊ घातलेले पराभव झाकण्यासाठीच का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला, तुमचे पराभव झाकण्यासाठी देश निवडणुकीच्या रांगेत उभा करणार का ? असे ही ते यावेळी म्हणाले.
इव्हीएममुळे भाजप विजयी
पुढील निवडणुका पटपत्रिकेवर घेण्यात याव्यात यासाठी सर्व पक्षाने एकत्र आले पाहिजे, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे, ईव्हीएम मुळेच भाजपचे उमेदवार निवडून येतात अशी टीका ठाकरे यांनी केली.

No comments:
Post a Comment