शासनाचा कायदा अन शेतकऱ्यांचा फायदा
लातूर :शेतात काम करत असताना किंवा वनक्षेत्रामध्ये एखाद्या प्राण्याने मारल्यामुळे जीव गेला किंवा अवयव निकामी झाला तर शासनाकडून नुकसान भरपाई मिळते. पण आपल्याला हे माहीतच नाही .कायदा जुनाच आहे पण माहित नसल्याने शेकडो लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत .
शेतकऱ्यांना असा लाभ मिळू शकतो पण त्यासाठी 24 तासांच्या आत तक्रार किंवा संबंधित याकडे मागणी करावी लागते .आणि हो ,ज्याचा मृत्यू झाला किंवा जो जखमी झाला त्याच्या नावावर शेती असावी लागते .म्हणजेच ७ /१२ व ८ अ चा उतारा गरजेचा असतो.
कशासाठी किंवा कोणत्या प्राण्याने मारले तर मदत मिळते असा प्रश्न आता उपस्थित होतो .तर अगदी बैलाने शिंग मारले तरीही ही मदत मिळू शकते .2015 साली कृषी आणि वनविभागाने नुकसान भरपाई चा कायदा केला आहे .यानुसार शेतात काम करत असताना बैलाने शिंग मारले आणि जखमी केल्यामुळे एखादा अवयव निकामी झाला तर एक लाख रुपयांची मदत आणि दवाखान्याचा खर्च मिळू शकतो . शेतात काम करताना साप चावला तर 50 हजार रुपये भरपाई मिळते .विजेचा धक्का बसला आणि त्यात मृत्यू झाला तर एक लाख रुपये मिळतात .विशेष म्हणजे डुकराने चावा घेतला तरीही दीड लाख रुपयांची मदत शासन देते .एखाद्या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपयांची मदत मिळू शकते .अगदी झाडावरून पडून मृत्यू झाला तरीही दोन लाख रुपये मदत देण्याची तरतूद शासनाने करून ठेवली आहे .
वन्य प्राण्यांनी फळबागांचे नुकसान केले तर प्रति झाड 500 रुपये भरपाई शासन देते. पण दुर्दैव असे की समाजसेवक म्हणवून घेत दररोज बंद ,मोर्चे आणि तोडफोड करून अन्यायग्रस्ताला भरपाई देण्याची मागणी करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना शासनाने केलेल्या या कायद्याची माहितीच नाही .हा कायदा माहित झाला तर सामान्य शेतकऱ्यांचे उपचारासाठी खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत .शिवाय दुर्दैवी मृत्यू झाला तर शेतकर्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकणार आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment