स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे नांदेडमध्ये आगमन

Friday, August 24, 2018

नांदेड/विश्‍वास गुंडावार
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या कलशाचे शुक्रवारी सकाळी नांदेडात आगमन झाले.पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थीकलशाचे अंतीम दर्शन घेतांना नंदिग्राम नगरीतील कार्यकर्ते गहिवरले होते.या अस्थीकलशाचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी काळेश्‍वर येथे गोदावरी नदीत अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत.

वाजपेयी यांची अस्थी कलश यात्रा देशातील सर्व जिल्ह्यामध्ये काढुन त्या अस्थींचे सर्व नद्यामध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे.देशाच्या कानाकोपर्‍यातील लोकांना या लाडक्या दिवंगत नेत्याला श्राद्धांजली वाहता यावी,यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भाजपाचे सरचिटणीस आ.सुरजितसिंह ठाकुर व प्रविण घुगे हे रस्ता मार्गे अस्थीकलश नांदेडमध्ये घेऊन आले.पुर्णा रोड येथील श्री.मारोती मंदिराजवळ त्यांनी अस्थीकलश जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर यांच्याकडे सुपुर्द केला.रथयात्रेद्वारे हा अस्थीकलश छत्रपती चौक,तरोडा नाका,राज कॉर्नर,वर्कशॉप,श्रीनगर मार्गे शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला.अस्थीकलश रथयात्रेसोबत आ.सुरजितसिंह ठाकुर,गणपतराव देशमुख,प्रविण घुगे,महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,धनाजीराव देशमुख,चैतन्यबापु देशमुख,प्रविण साले,राजेश पवार,सौ.पुनमताई पवार,सौ.मिनल पाटील खतगावकर,प्रतापराव पवार,व्यंकटेश साठे,सुरेंद्र घोडजकर आदी होते.यावे़ळी अमर रहे,अमर रहे,अटलजी अमर रहे,भारत माती की जय अशा घोषणा देण्यात येत होत्या.

सभागृहात अस्थीकलश ठेवल्यानंतर राज्याचे कामगार कल्याण,कौशल्य मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर,विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे,प्रदेश प्रवक्ते सुनिल नेरलकर,प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,आ विनायकराव पाटील ,माजी खा.डी.बी. पाटील,माजी मंत्री माधवराव किन्हाळकर,डॉ.व्यंकटेश काब्दे,मिलींद देशमुख,विजय सोनावणे,दिलीपसिंघ सोढी,नगरसेविका गुरप्रितकौर सोढी,अरविंद भारतीया,बालाजी बच्चेवार,श्रावण भिलवंडे,माणिकराव लोहगावे,अभिषेक सौदे,राजेंद्रसिघ पुजारी,लक्ष्मण ठक्करवाड,शिवसेना आ.सुभाष साबने,जिल्हाप्रमुख भुजंग पाटील,युवा सेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे,धोंडु पाटील,प्रकाश मारावार,बालाजी कल्याणकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे अंतिम दर्शन घेतले.

स्व.वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता कुसुम सभागृह येथे सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment