लातूर / प्रतिनिधी
राज्यभरातील 76 अधिकाऱ्यांच्या बदल्या 23 ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. तसे पत्रही मंत्रालयातून प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये मराठवाड्यातील 15 उपजिल्हाधिकारी व 44 तहसीलदार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
मराठवाडा वगळता इतर 17 उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय बदलीत समावेश असून यामध्ये औरंगाबाद विभागातील हिंगोली येथील उपजिल्हाधिकारी सामान्य पांडुरंग बोरगावकर यांची बदली उपविभागीय अधिकारी कंधार, लातूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रदिप मरावळे यांची बदली उपविभागीय अधिकारी देगलूर, निबंधक मराठवाडा प्रशासकीय प्रबोधनी पांडुरंग कुलकर्णी यांची बदली उपविभागीय अधिकारी अहमदपूर, सहाय्यक आयुक्त औरंगाबाद शशिकांत हतगल यांची बदली उपविभागीय अधिकारी अंबड, सहाय्यक आयुक्त औरंगाबाद सरिता सुत्रावे यांची बदली विशेष भुसंपादन अधिकारी औरंगाबाद, निवासी उपजिल्हाधिकारी बीड चंद्रकांत सुर्यवंशी यांची बदली निवासी उपजिल्हाधिकारी हिंगोली, विशेष भुसंपादन अधिकारी औरंगाबाद यांची बदली निवासी उपजिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी विकास माने यांची बदली उपविभागीय अधिकारी निलंगा, उपविभागीय अधिकारी कंधार प्रभोदय मुळे यांची बदली उपविभागीय अधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी देगलुर व्ही.एल.कोळी यांची बदली उपविभागीय अधिकारी पाथरी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी नांदेड दिलीप कच्छवे यांची बदली उपजिल्हाधिकारी नांदेड, दिपाली मोतीयळे यांची बदली उपजिल्हा निवडणुक अधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी रोहियो हिंगोली के.ए.तडवी यांची बदली विशेष संपादन अधिकारी बीड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांची बदली उपविभागीय अधिकारी बिलोली, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर नांदेड यांची बदली निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड या ठिकाणी करण्यात आली आहे. तर तहसीलदार संवर्गातील तहसीलदार रूपेश श्रृंगारे औंरंगाबाद यांची बदली उपप्रबंधक महाराष्ट्र न्यायाधिककरण औरंगाबाद, तहसीलदार महसूल जिल्हा परभणी विद्या शिंदे यांची बदली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली, तहसीलदार सा.प्र. विभागीय आयुक्त औरंगाबाद विजय राऊत यांची बदली तहसीलदार उस्मानाबाद, तहसीलदार न.पा. प्र.वि. आयुक्त औरंगाबाद ऐश्वर्या काळूसे तहसीलदार महसूल औरंगाबाद, तहसीलदार म.म.प्र.प्र.औरंगाबाद आम्रपाली कासोदेकर यांची बदली तहसीलदार विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद मनिषा मेने यांची बदली तहसीलदार, उपजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, तहसीलदार महसूल बीड मनिषा तेलभाते यांची बदली महसूल सहाय्यक जि.का.परभणी, तहसीलदार लातूर संजय वारकड यांची बदली तहसीलदार केज, तहसीलदार कळमनुरी प्रतिभा गोरे यांची बदली तहसीलदार महसूल बीड, तहसीलदार औसा अहिल्या गाठाळ यांची बदली तहसीलदार संगायो लातूर, तहसीलदार लोहारा शोभा पुजारी यांची बदली तहसीलदार औसा, तहसीलदार हिमायतनगर कैलाशचंद्र वाघमारे यांची बदली तहसीलदार कळमनुरी, तहसीलदार अर्धापूर अरविंद नर्सीकर यांची बदली तहसीलदार सामान्य जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, तहसीलदार उस्मानाबाद सुजित नरहरे यांची बदली तहसीलदार अर्धापुर, तहसीलदार केज अविनाश कांबळे यांची बदली तहसीलदार लातूर, तहसीलदार उमरगा अरविंद बोळंगे यांची बदली तहसीलदार देगलुर, तहसीलदार गेवराई संजय पवार यांची बदली तहसीलदार उमरगा, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जालना किशोर देशमुख यांची बदली तहसीलदार अंबड, तहसीलदार अंबड डी.एम. भारस्कर यांची बदली सहाय्यक पुरवठा औरंगाबाद, तहसीलदार परतूर डी.डी. फुपाटे यांची बदली तहसीलदार मानवत, तहसीलदार धारूर राजाभाऊ कदम यांची बदली तहसीलदार परतुर, तहसीलदार मंठा राहूल गायकवाड यांची बदली तहसीलदार खुलताबाद, तहसीलदार वैजापूर सुमन मोरे यांची बदली तहसीलदार मंठा, तहसीलदार बिलोली विनोद गुंडमवार यांची बदली तहसीलदार वैजापूर, तहसीलदार माहूर विक्रम राजपूत तहसीलदार बिलोली, तहसीलदार आष्टी रामेश्वर गोरे यांची तहसीलदार सिल्लोड, तहसीलदार कंधार अरूणा संगेवार यांची बदली तहसीलदार अहमदपुर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी बीड एस.टी.झिरवाळ यांची बदली तहसीलदार आष्टी, तहसीलदार सं.गा.यो. औरंगाबाद प्रणाली तायडे यांची बदली तहसीलदार मराठवाडा महसूल प्रबोधनी औरंगाबाद, तहसीलदार खुलताबाद अरूण जऱ्हाड यांची बदली तहसीलदार गंगापूर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड संतोष देवकुळे यांची बदली तहसीलदार कंधार, तहसीलदार स.गा.यो. नांदेड व्ही.यु. अवधाने यांची बदली तहसीलदार माहूर, तहसीलदार सामान्य बीड एस.व्ही. पवार यांची बदली तहसीलदार धारूर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी सखाराम मांडावगडे यांची बदली तहसीलदार गेवराई, तहसीलदार सं.गा.यो. उस्मानाबाद राहूल पाटील यांची बदली तहसीलदार लोहारा, अन्नधान्य वितरण अधिकारी औरंगाबाद अनिता भालेराव यांची बदली तहसीलदार सं.गा.यो. औरंगाबाद, तहसीलदार मुकरदन योगीता कोले यांची बदली तहसीलदार नगर पालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, तहसीलदार सिल्लोड संतोष गोरड यांची बदली तहसीलदर भोकरदन, तहसीलदार लोहा आशिष बिरादार यांची बदली तहसीलदार हिमायतनगर, विठ्ठल परळीकर यांची बदली तहसीलदार लोहा, तहसीलदार गंगाखेड आसाराम छडीदार यांची बदली तहसीलदार सेलू, स्वरूप कंकाळ यांची बदली तहसीलदार गंगाखेड, तहसीलदार सोयगाय छाया पवार यांची बदली तहसीलदार बदनापूर, तहसीलदार बदनापूर पी.एल.पांडे यांची बदली तहसीलदार सोयगाव सदरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून या अधिकाऱ्यांना पदस्थापनेच्या पदावर संबंधित विभागाने तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेशही काढण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment