
कॉंग्रेसचे पाच नगरसेवक, भाजपाचे तीन
दिल्ली / प्रतिनिधी
जात पडताळणीचे प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत दाखल करावेत अशा प्रकारचा कायदा असताना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केलेल्या नगरसेवकांचे आपोआप नगरसेवक पद रद्द होते. या संदर्भात लातूर मनपातील आठ नगरसेवकांचे नगरसेवक पद आपोआप रद्द होत आहे. ज्यात कॉंग्रेसचे पाच- युनूस मोमीन, आय्युब मनियार, डॉ. फर्जाना बागवान, मीना लोखंडे, सौ. बरुरे भाजपाचे तीन- अजय दुडीले, भाग्यश्री शेळके, सौ. कोमल वायचाळकर यांचा समावेश आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जात पडताळणी संदर्भात अधिकृत प्रमाणपत्र कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्याच्या आत दिलेच पाहिजे. जर नाही दिले तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होते. या संदर्भात दिल्ली सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होणार याने फार मोठा दणका बसला असून महाराष्ट्रात किती लोकांना पद गमवावे लागणार हे अध्याप कळु शकले नाही. पण लातूर मनपतील आठ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यासंदर्भात दिल्ली सर्वोच्च न्यायालयात एका विधीज्ञाशी संपर्क साधला असता अशा प्रकारचे साधारणत: एकूण 20 प्रकरणे न्यायप्रविष्ठ होते. याचा फार मोठा दणका बसला आहे. पुढे काय होणार इकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment