लातूर / प्रतिनिधी
मागच्या दोन वर्षात झालेल्या सामुहिक प्रयत्नातून लातूर जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. परंतू, पुढच्या पिढीने धन्यवाद मानले पाहिजे त्या दृष्टीने ब्लयू प्रिंट तयार करून जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करू या असा संकल्प पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जाहीर केला.
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत भारतीय जैन संघटना- मृद व जलसंधारण विभाग सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणी कार्यशाळा दयानंद सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा. सुनिल गायकवाड, आ. त्र्यंबक भिसे, आ.विक्रम काळे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा, जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, सीईओ बिपीन इटनकर, सी.ए.सुनिल कोचेटा आदी उपस्थित होते. अडचणीच्या काळात जात-धर्म, पक्ष, गट विसरून काम करणे हे लातूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असल्याचे नमुद करून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. एकत्रित प्रयत्न झाल्याने 600 टॅंकरला लातूर जिल्हा टॅंकरमुक्त झाला. भविष्यात पिकांच्या पद्धतीत बदल करावा लागेल. नद्या, ओढे, नाले लुप्त झाल्याचे दिसत नाहीत. ते जीवंत करणे गरजेचे आहे. लोकसहभागातून लातूरचा दुष्काळी चेहरा आपणास कायमस्वरूपी पुसायचा आहे.
मागच्या दोन वर्षात झालेल्या जलयुक्त शिवर कामातून जिल्ह्याची साडेतीन तर निलंगा तालुक्याची पाच मिटरने पाणीपातळी वाढली असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, मागच्या वर्षी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली. विक्रम उत्पन्न याचा अभिमान आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निश्चय केल्याने सारे शक्य झाल्याचे ते म्हणाले. आगामी गणेश उत्सवात जिल्ह्यातील 900 गणेश मंडळाचा सहभाग या कामा घ्यावा प्रत्येक गणेश मंडळाने दररोज दहा शौच खड्डे या प्रमाणे एक लाख शौच खड्डे तयार होतील. तसेच मागच्या दोन वर्षात लातूर जिल्हा वृक्षारोपणात प्रथम झाला आणि 85 टक्के झाडे टिकली असल्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी यावेळी केला. बीजेएस प्रमुख शांतीलाल मुथ्था यांनी येत्या जून पर्यंत लातूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प व्यक्त केला. याकामी बीजेएस जेवढ्या मशिन्स लागतील. तेवढ्या पुरवेल आमचे फक्त आठ महिन्यात सहा कज्ञोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त पाणी साठवणूक करण्याचे उद्दीष्ट यावर्षी बीजेएसने लातूरसह पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले.
आ. विक्रम काळे यांनी मागच्या काळात शासन-संघटनांच्या समन्वयातून झालेल्या कामाचा आढावा घ्यावा तसेच सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ यांची कार्यशाळा घेवून आराखडा तयार करण्याच्या सुचना केली. पाशा पटेल यांनी तांत्रिक दृष्ट्या दुष्काळ मुक्तीसाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक असल्याचे आणि जिल्ह्याचे टेकड्या हिरण्या करण्याचे सुचना यावेळी केली. याकामी फिनीक्स, आरसीएफ ह्या माझ्या संस्थांकडून आवश्यक ती सर्व मदत, सहकार्य करण्याची ग्वाही पाशा पटेल यांनी दिली. याप्रसंगी एकनाथ डवले, खा. सुनिल गायकवाड, आ. त्र्यंबक भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment