पालकमंत्री निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजपा बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा रामवाडीत मेळावा

Wednesday, August 29, 2018




रेणापूर, दि. 29 – लोकसभा निवडणूक पुर्व तयारीच्या अनुशंगाने रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या बुध प्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हयाचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणापूर तालुक्यातील रामवाडी (खरोळा) येथे सोमवार, दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.


या मेळाव्यात लोकसभा निवडणूकीच्या विजयाचा निर्धार करुन तिन लाख मताधिक्याचा संकल्प करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आ. सुरेशअण्णा धस यांचा सत्कार तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत काम करणाऱ्या रेणापूर तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य लातूर ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड हे राहणार आहेत. या मेळाव्यासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, खा. डॉ. सुनिल गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संजय दोरवे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषि सभापती बजरंग जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ. संगिताताई घुले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमित रेड्डी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्ग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपाचे पंचायत समिती सभापती, सर्व नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


या मेळाव्यास रेणापूर तालुक्यातील सर्व भाजपाचे बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे ॲङ दशरथ सरवदे, रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, डॉ. बाबासाहेब घुले, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, संगायोचे तालुकाध्यक्ष श्रीकिशन जाधव, रमाकांत फुलारी, संतोश चव्हाण, नरसिंग यलगटे, सौ. ललिता कांबळे यांनी केले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment