लोहा - कंधार तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकांचे तत्काळ पंचनामे होणार
नांदेड- लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात सोयाबीन पिकांवर खोड अळी व कापसावर गतवर्षी प्रमाणे यंदाही बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. आशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे असुन त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महसूलमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे नुकतीच प्रत्यक्ष भेटून केली आहे. याबाबतची मंत्रीमहोदयांनी दखल घेतली असुन जिल्हाधिकारी यांना लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील सोयाबीन,कापूस या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत,अशीु सुचना केली आहे.
लोहा-कंधार या दोन्ही तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे हतबल झाले आहेत. या वर्षी पेरणी चांगली झाली,पिकांची उगवणही चांगली झाली. पंरतु नंतरच्या काळात मात्र गतवर्षी सारखेच याहीवर्षी कापूस या पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पीकही खोड अळीने नष्ट झाले आहे. काही भागात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. अशा परिस्थितीमुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे.
आ. चिखलीकरांनी नुकताच लोहा व कंधार तालुक्याचा दौरा करून पिकांची पाहणी केली. या पाहणीत त्यांना कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे,या हेतूने त्यांनी महसूलमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या गंभीर बाबीवर चर्चा केली.
तसेच या आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी केली. ना.पाटील यांनी या बाबीची दखल घेतली असुन जिल्हाधिकारी यांना लोहा-कंधार तालुक्यातील पिकांचे त्वरित पंचनामे करावीत,अशी सुचना केली. या बद्दल आ.प्रतापराव पाटील चिखलीकरांनी ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment