दत्तस्वरूप आप्पा बाबा उद्यापासून परराष्ट्र दौऱ्यावर

Wednesday, August 29, 2018



रूईभर / प्रतिनिधी 
येथील दत्त तीर्थक्षेत्राचे आप्पा बाबा हे उद्यापासून 24 सप्टेंबरपर्यंत परराष्ट्र दौऱ्यावंर जात आहेत. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने त्यांच्या या दौऱ्यास शुभेच्छा. 
       30 ऑगस्ट रोजी रात्री पुण्याकडे, पुण्याहून विमानाने दुबई, मॅचेस्टर, लंडन, नॉर्वे, पोलंड, टेन मॉर्क, यो बेहरी, क्रॅको, पोसलो इकडचा दौरा आहे. प.पु.दत्तस्वरूप आप्पा बाबा हे देश, देव आणि धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. आतापर्यंत किमान नऊ वेळा त्यांचा परराष्ट्र दौरा झालेला आहे. परराष्ट्रात सुद्धा आप्पा बाबांना मानणारा खुप मोठा वर्ग आहे. त्यांचे कार्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मुलन त्याचप्रकारे भारतीय संस्कृती, धर्म व सकारात्मक विचाराच्या माध्यमातून लोक शिक्षण करण्याचे ते कार्य करतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आहेत. 

           एका बाजुला मंदिर, मस्जिद आणि संत हे जातीयतेच्या कप्यात बंद होत आहेत. अशा परिस्थितीत खरातो एकची धर्म, या भुमिकेतून त्यांच कार्य आहे. गरीब, श्रीमंत असा ते भेद करत नाहीत. त्यामुळे सर्व जाती, धर्माचे भक्त त्यांच्याकडे येतात. सकारात्मक विचारातून जीवनात आपलं उद्दीष्ट गाठण्यासाठी थेट मार्गदर्शन करत असतात. 

         रूईभर या ठिकाणी दत्तजयंती, गुरूपोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा असे उत्सव साजरे केले जातात. त्या ठिकाणी दर गुरूवारी दुपारी बारा वाजता आरती असते. तेथे मोठ्या प्रमाणात श्रद्धा, भक्तीने भाविक येतात. त्याचप्रकारे त्यांचा प्रगटदिन दरवर्षी पुण्यात साजरा होतो. 
       रूईभर येथे मासिकाचे प्रकाशन होते. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था आहे. निवासासाठी तीस खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. तर संत महंतांना राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी दत्त संस्थानची प्रगती होत आहे. हे सर्व करत असताना कोणालाही देणगी मागितली जात नाही. आप्पा बाबा हे खेडे, तांड्या, वस्त्या येथे जात असतात. आणि सातत्याने देश, देव व धर्म याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं लोकशिक्षणाचं, प्रबोधनाचं कार्य हे करत आहेत. रूईभर येथे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून जयपूर येथून खास राजस्थानी दगड आणला जात आहे. त्या ठिकाणी स्वच्छता, अन्नदान, वृक्षारोपण, रक्तदान असे विविध उपक्रमाबरोबरच ते आरोग्य शिबीराचे पण आयोजन करतात. त्यामुळे रूईभर क्षेत्राचा सर्वत्र नावलौकिक होत आहे. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने त्यांच्या या दौऱ्यास शुभेच्छा

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment