नांदेड:-
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण हे निवडणूक लढविणार असल्यामुळे तुझं कांही खर नाही असा मित्रत्वाचा सल्ला काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी भाजपाचे संभाव्य उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना दिला होता, त्यावेळी कंदकुर्ते म्हणाले, साहेबांना डॉक्टर काब्दे हारवू शकतात तर मी का हरवू शकत नाही. मतदारांच्या मनात आल्यानंतर कांहीही होवू शकते. त्यावर राजूरकर म्हणाले, साहेब निवडणूक लढविणार असल्यामुळे तु निवडणूक लढविण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्ला दिला. यावर कंदकुर्ते यांनी प्रतिउत्तर देताना राजूरकरांना म्हणाले, दक्षिण हा माझा मतदारसंघ आहे, यापूर्वीही निवडणूक लढविली यापुढेही निवडणूक लढविणार हार-जीत जनतेच्या दरबारात होईल असे ठणकावून सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment