विशेष प्रतिनिधी
नांदेड-आगामी लोकसभेच्या निवडणूकीत परभाव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण हे विधानसभ निवडणुक लढविण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षाने आदेश दिल्यास आपण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सुतोवाच केले. अशोकराव कोठूनही निवडणूक लढविल्यास त्यांचा पराभव अटळ असून आगामी विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे नऊ आमदार विजयी होतील असा विश्वास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघातून अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत झालेले भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. चिखलीकर हे बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपा शहर महानगरचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रारंभी कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आ.चिखलीकर यांनी दिलीप कंदकुर्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जाहिररित्या म्हणाले, यंदा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा आमदारच निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. गेल्या निवडणूकीत मी शिवसेनेचा होतो त्यामुळे कंदकुर्ते यांच्या पराभवात माझाही खारीचा वाटा आहे. आता आपण भाजपासोबत असल्यामुळे आगामी निवडणूकीत भाजपाचाच आमदार होणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंजावातमुळे आगामी लोकसभेच्या निवडणूकीत आपला पराभव होणार या भितीपोटीच नांदेडचे खासदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सूतोवाच केले आहे. हिंमत असेल तर अशोकरावांनी नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढवून दाखवावीच असे खुले आव्हान आ. चिखलीकर यांनी दिले आहे.
भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळत असल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी लोकसभेऐवजी विधानसभेची निवडणूक नांदेड दक्षिणमधून लढविण्याची तयारी दर्शविली आहे. तेही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण दक्षिणमधून निवडणूक लढविणार असे सांगितले. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाणांच्या हातात स्वत:चीच उमेदवारी जाहिर करण्याची दानत त्यांच्यात नसल्याचा टोलाही खा. चव्हाण यांना यावेळी लगावला आहे.
भारतीय जनता पार्टीकडे पितृतूल्य नेतृत्व असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीची जबाबदारी नवनिर्वाचित आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यावर येवून पडली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नांदेड दक्षिणच नव्हे कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास त्यांचा पराभव अटळ असल्यामुळे आगामी काळात भाजपाचे नऊ आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करताना आ. चिखलीकर म्हणाले, आ. राम पाटील म्हणाले होते, भाजपाचे आठ आमदार आगामी काळात निवडून येतील पण एक कोणता मतदारसंघ सोडला हे माहित नाही पण भाजपाचे ऩऊच्या नऊ आमदार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment