मुखेड .: यशवंत बोडके
:स्वातंत्र्याला सत्तर वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही रस्ता न पाहिलेल्या तालुक्यातील कासरवाडी या गावाचे नशिब आ .डॉ .तुषार राठोड यांच्यामुळे पालटणार आहे. आ.राठोड यांच्या प्रयत्नाने कासरवाडी गावचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश झाला असून रस्त्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत.
कासारवाडी हे अडीचशे- तीनशे लोकवस्तीचे एक अत्यंत छोटे गाव आहे .गाव छोटे असल्याने साहजिकच आजपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्याने गावाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे गावात येण्यासाठी रस्ता झालाच नाही .देशभरात दळणवळण क्षेत्रात क्रांती होत असताना या गावाला पक्का रस्ता मिळाला नाही .त्यामुळे गावातील नागरिकांना इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी आतापर्यंत त्रास सहन करावा लागला .शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली .आरोग्य क्षेत्रात तर न विचारलेले बरे . एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली .रस्ता नसल्यामुळे या गावातील एक पिढी बरबाद झाली आणि बाहेरील जगापासून दूर राहिली .
आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी दखल न घेतलेल्या कासरवाडीकडे आ तुषार राठोड यांचे लक्ष गेले .या गावात रस्ता नसल्याचे लक्षात आल्यानंतर आ.राठोड यांनी गावात बैठक घेतली .गावात येण्यासाठी असणाऱ्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढा मी तुम्हाला रस्ता करून देतो असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले .गावातील शेतकरी व नागरिकांनी तात्काळ अतिक्रमणे काढण्यास सहमती दर्शवली. पहिल्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर आ.तुषार राठोड यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. कासरवाडी ची कथा त्यांच्या कानावर घातली . पंकजाताई मुंडे यांनी लगेचच निधी देण्याचे आश्वासन देऊन कासरवाडी व गवळेवाडी या दोन गावांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश केला .या दोन गावांसाठी दोन कोटी 60 लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला
.आ. डॉ.तुषार राठोड यांनी पुढाकार घेतल्यामुळे कासरवाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता होणार आहे. पक्का रस्ता झाल्यानंतर या गावचा इतर गावांशी संपर्क होऊ शकणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून आठ दिवसात कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती आ. डॉ. राठोड यांनी दिली .या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. आतापर्यंत पाणंद रस्त्याने प्रवास करावा लागल्यानंतर पक्का रस्ता होणार असल्यामुळे कासरवाडी आणि गवळेवाडी चे ग्रामस्थ आ. तुषार राठोड यांचे आभार मानत आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment