इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स करणार लातुरात संशोधन - पाशा पटेल

Tuesday, August 28, 2018

लातूर /प्रतिनिधी : 
अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्य करणारी बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक संशोधन करतात. या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जागतिक पातळीवर मान्य झालेले असून आता राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी शास्त्रज्ञ कार्य करत आहेत .त्यानुसार या संशोधनासाठी लातूर व यवतमाळ जिल्ह्याची निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली .

यासंदर्भात माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले आहे .या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण पाठपुरावा केला होता.दि २७ जुलै रोजी प्रत्यक्षात तेथे जाऊन तंत्रज्ञानाची पाहणी केल्यानंतर ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली .मुख्यमंत्र्यांनी या शास्त्रज्ञांना भेटीसाठी बोलावून घेतले .दि .१३ ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत एक तास चर्चा केली .या चर्चे नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका पाहता ते टेक्नोक्रॅट आहेत .राजकीय पुढारी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे व्यक्ती असल्याचे या शास्त्रज्ञानी बोलून दाखवले. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेसाठी हैदराबाद येथे बोलावण्यात आले .नव्या तंत्रज्ञानाची गरज ओळखुन मुख्यमंत्र्यानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे शास्त्रज्ञ आणि राज्यातील चारही विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ यांची बैठक घेण्याचे निर्देश दिले होते .त्यानुसार सोमवारी (दि .२७ जुलै)पुणे येथे बैठक घेण्यात आली .

या बैठकीस महाराष्ट्रराज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह कृषी आयुक्त तथा MCAER चे कार्यकारी संचालक एस पी सिंग ,इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसचे शास्त्रज्ञ डॉ के पी जे रेड्डी ,डॉ एस एन ओमकार यांची प्रमुख उपस्थिती होती . चार तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील शास्त्रज्ञांसोबत दोन वर्ष काम करण्यास आपण तयार असल्याचे बेंगलोरच्या शास्त्रज्ञानी सांगितले .रेड्डी यांनी या बैठकीत बोलताना राज्याच्या गरजा नेमक्या काय आहेत त्या शोधा ,त्यानुसार ड्रोण तयार करता येईल असे सांगितले. हे अद्ययावत तंत्रज्ञान घरात न ठेवता शेतकऱ्यांच्या हितासाठी ते तुम्हालाही शिकवू असा शब्द त्यांनी दिला .यानुसार राज्यातील शास्त्रज्ञ व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अद्ययावत तंत्रज्ञानाचा आदर केला. तंत्रज्ञान व विज्ञानाला किंमत देणारा हा देशातील एकमेव मुख्यमंत्री असल्याचे त्या शास्त्रज्ञांनी सांगितले .या शास्त्रज्ञांनी केलेल्या सूचनांनुसार मुख्यमंत्र्यांनी राज्यात या तंत्रज्ञानानुसार काम सुरू करण्याचा आदेश दिला आहे .त्यानुसार सोयाबीन पिकासंदर्भात लातूर जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यात कापूस पिकासंदर्भात संशोधन केले जाणार आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि राज्यातील शास्त्रज्ञ संशोधन करणार असून त्यानंतर यासाठी विशेष ड्रोन तयार करण्यात येणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाशा पटेल यांनी केलेले काम पाहून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे शास्त्रज्ञ भारावून गेले. आतापर्यंत अनेक राजकीय नेते पाहिले परंतु शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी लढणारा असा नेता पाहण्यात आला नाही असे गौरवोद्गारही बंगलोरच्या शास्त्रज्ञांनी काढले .पाशा पटेल यांची तळमळ पाहूनच आपण राज्य सरकारसोबत काम करण्यास तयार असल्याचेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment