पंकजाताई ठरल्या पहिल्या नेत्या

Friday, July 27, 2018

लातूर दि २७ प्रतिनिधी 
एका बाजुला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार, मंत्री यांना सळो की पळो केले जात असतांना परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या धरणे आंदोलनात ना.पंकजाताई मुंडे यांनी भेट दिली. आणि भेटच नाही तर त्यांनी जे विचार मांडले, मी तुमची दूत आहे, वाघांनो आत्महत्या करु नका, मी तुमच्या प्रश्‍नासाठी मुख्यमंत्र्यांकडे, पंतप्रधानांकडे येईल. अशा प्रकारे आंदोलकांनी ना.पंकजाताईंच्या भाषणामध्ये पाच ते सहा वेळा टाळ्या वाजवल्या.

 यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये लोकांना गोपीनाथरावजी मुंडे यांची आठवण होत होती. आणि एक आई संवेदनशील विषयावर किती गंभीर होते, हेही लोकांना पाहण्यास मिळाले. महाराष्ट्रातील ठोक मोर्चाची सुरुवात परळीत झाली आहे. मात्र येथे ताईंनी भाषण करुन आंदोलकांची मने जिंकली, यावर सहज चर्चा होती, त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकलं...!
अभूतपूर्व, विराट कॅनव्हा
लातूर विमानतळावर ना.पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी होती. घोषणांनी सारा विमानतळ परिसर दणाणून निघाला होता आणि पहिल्यांदाच एवढा मोठा कॅनव्हा येथे लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या निवासस्थानी येथे आले. त्यावेळी खा.प्रिमताई मुंडे, मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, दुग्धविकास मंत्री ना.महादेव जाणकर हे आले. रमेशअप्पा  कराड यांच्या निवासस्थानी दिड ते दोन तास ना.पंकजाताई होत्या. यावेळी रेणापूर, लातूर ग्रामीणचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि रमेश कराड कोठे आहेत, या प्रश्नाचे  अनेकांना उत्तर मिळाले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment