महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर
मुंबई ःप्रतिनिधी
मराठा समाजाला न्याय देवून विकासाकडे घेवून जाणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असे मत व्यक्त करून महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकास मंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, मराठा समाजाच्या नेत्यांनी वागलेल्या आणि केलेल्या कृतीमुळे हे मराठा समाजाला दिवस आले आहेत असं मत व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली असा सवाल करून ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शाहू राजे यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र ठेवून न्याय देण्याचे, संरक्षण करण्याचे आणि विकास करण्याचे काम केले असंही म्हणाले.
आरक्षण मागण्याची वेळ समाजावर का आली याला जबाबदार कोण आहे, गेल्या साठ वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे नेते होते. त्यांनी देशात आणि राज्यात महत्वाची पदे भुषविली. याप्रसंगी ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आमच्या बंधूंना आत्महत्या करण्याची परिस्थिती का आली, लोक रस्त्यावर का आले असे सांगून ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, ही परिस्थिती गेल्या दोन ते चार वर्षात निर्माण झालेली नाही. चाळीस वर्षापुर्वीचा मराठा समाजाचा सन्मान, स्वाभिमान व त्यांच्या मुलभूत गरजांचा विचार त्या राजकीय नेत्यांनी करायला हवा होता. तो केला नाही. आज अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याचे कारण त्या मंडळींनी सत्तेचा वापर विकासासाठी, मराठा समाजाच्या प्रगतीसाठी केला नाही आणि त्यामुळे शेतीत राबणारा समाज हा अडचणीत आला. याला जबाबदार कोण असं सांगत असताना गेल्या ६० वर्षात चुकीची धोरणं, चुकीचे निर्णय, चुकीच्या पद्धती यामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे. ६० वर्षात ते शेतकर्यांसाठी मराठा समाजासाठी राज्यकर्त्यांनी केले नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. नोकर भरतीत १६ टक्के व शेतकर्यांचे मराठा समाजाच्या हित रक्षणासाठी जे-जे करणे शक्य होते. ते ते करण्याचा त्याचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतु आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादींनी मराठा समाजाला निवडणुकीत वोट बँक म्हणून वापरण्याचे काम केले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला न्याय भुमिका आणि आरक्षणाच्या दृष्टीकोणातून जे जे करणे गरजेचे आहे त्यासाठी अभ्यास करणे, समिती नेमणे हे केलेले आहे.
याउलट कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींनी आरक्षणाची घोषणा केली त्यांना ठावूक होते. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. पण त्यांनी धुळङ्गेक करण्याचे काम केले असं मत यावेळा दैनिक मराठावाडा नेताशी बोलताना ना. संभाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
मी मंत्री म्हणून नाही तर समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आत्महत्या बंद झाल्या पाहिजेत ही भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. आणि या परिस्थितीत मला ठाम विश्वास आहे की, मराठा समाजाला न्याय देण्याचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करत आहेत व करणार अशी भुमिका दै. मराठवाडा नेताशी बोलताना ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मांडली.
राज्यातील मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. नव्हे कांही मराठा बांधवांनी त्यासाठी आपले बलिदान देखील दिले आहे. जागोजागी आंदोलने होत आहेत. ठिय्या देऊन कांही बांधव बसले आहेत. मी एक मराठा या नात्याने या सगळ्या भावंडाच्या सोबतच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्यासाठीची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे या साठी एक मराठा म्हणून मी देखील आग्रही आहे.
आपली सगळ्यांची भावना आणि स्थिती मी समजू शकतो. आज राज्यात मंत्री असलो तरी मी देखील सामान्य कार्यकर्ताच आहे. मी देखील माझ्या परिवाराची राजकीय पार्श्वभुमी असतानाही वंचितांची दुःख घरातच अनुभवली आहेत. म्हणून या वेदना मी देखील समजू शकतो. खरी वेदना होते ती कोणी आपल्या न्याय हक्कासाठी आपला लाख मोलाचा जीव देतो तेंव्हा. आपल्या न्याय्य हक्कासाठी कोणाला जीव द्यावा लागावा हिच गोष्ट खुप यातनादायक आहे.
आत्महत्या करण्याची वेळ आली. ती का आली? कोणामुळे आली? याचा विचार होणे आवश्यक आहे. आजवर राज्यात कोणाची सत्ता होती? ज्यांनी राज्याला स्वतःच्या राजकीय इच्छापोटी आज वेठीला धरले आहे त्यांनी या प्रश्नासाठी काय केले हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. असंही ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले मराठा समाजातील तरूण आज आपल्या रोजीरोटीसाठी अस्वस्थ आहे. त्याला आरक्षणाचा आधार मिळाला नाही तर तो उभा राहू शकणार नाही ही स्थिती कोणामुळे आली? याला जबाबदार कोण आहे? याचा विचार तर करावाच लागणार आहे.
आत्मघाता ईतकी वेळ आलीच कशी? ज्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात राज्य अनेक वर्ष राहिले त्याकाळात दोन्ही पक्षांच्या सत्ताधारीवर्गाने कोणती भुमिका घेतली होती. मराठा समाजासाठी कोणती ठोस आणि आश्वासक कृती केली होती. मराठा तरूण दिशाहिन, शिक्षणविहिन राहू नये यासाठी कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्याचाच परिणाम आज मराठा समाजामध्ये अस्वस्थता दिसत आहे. खरतर या जीव जाण्याला त्या काळातील सरकारचं जबाबदार आहेत कारण ही अस्वस्थ करणारी स्थिती आज निर्माण झालेली नाही तर ती अनेक वर्षापासून बनत आलेली आहे.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यउत्तर काळात मराठा समाज शेतीवर अवलंबून होता. हाच समाज समाजघटकातील अन्यवर्गाला आपल्या बळावर आधार देत होता. आता या समाजाला आधाराची गरज निर्माण झाली. शेतीसोबत नौकरी अथवा जोडधंदा जे करत असत असतात त्यांना या स्थितीत स्वतःला व आपल्या परिवाराला उभा करता आले. मात्र ज्यांना तशी संधी मिळाली नाही ते आर्थिकदृष्टया हालाकीत राहिले. समाजाच्या या स्थितीला कॉंग्रेस राष्ट्रवादीचे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सरकारच जबाबदार आहे. मराठा आंदोलकांच्या आतमहत्यांना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्क्रीय सरकारच जबाबदार आहे. वास्तविक कोणतेच विकास कार्य न करता मराठा समाजाला वंचित ठेवल्याचा आरोप ठेऊन आधीच्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा असंही ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले.
मात्र हे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जात आहे. मुळात या आंदोलनालाचा राजकीय फायदा उठविणा-या मंडळीना केवळ फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी वापरायचे आहे. यात समाजहित हा मुद्दा राजकीय लाभ घेऊ इच्छीणा-यांच्या मनात कोठेच दिसत नाही.
इबीसीची उत्पन्न मर्यादा ङ्गडणविस यांनी वाढवत ५० हजारावरून ८ लाख रूपयांच्या पर्यंत नेले आहे. आर्थिक विकास मंडळाला भरघोस निधी दिला आहे. वसतिगृहाची घोषणा केली आहे. ज्यांना वसतिगृहाचा लाभ मिळणार नाही त्यांना रोख स्वरूपात मदत केली जात आहे.
कमी दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा आणि कार्यवाही करण्यात आली आहे. मागील चाळीस वर्षाच्या काळात ज्या कामांना मूर्त रूप देण्याचा कधीच प्रयत्न झाला नाही. आता फडणवीस सरकार ही भुमिका घेत आहे. असे असतानाही देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मराठा समाजातील कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे की, देवेद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून समाजाला न्याय देतील. आणि त्यांनीच आजवर न्याय देण्याचे काम केले आहे.
आज घाईत आणि गडबडीत आरक्षण दिले गेले तर ते कोर्टात टिकणार नाही. आणि असे तकलादू आरक्षण देऊन समाजाची फङ्सवणुकच होईल. कोणत्याही न्यायालयीन लढाईत टिकेल असेच आरक्षण हे सरकार नक्की देईल असा मला विश्वास आहे. आणि मराठा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभा आहे.
केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना लक्ष करण्याचा प्रकार निंदणीय असून देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून न्याय द्यायला सक्षम असतील असा विश्वास माझ्या मनात आहे.
जय शिवराय
No comments:
Post a Comment