सेनगाव तालुक्यातील सर्जेराव पोले खुन प्रकरण
हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील वडहिवरा येथील सर्जेराव पोले यांचा सात महिन्यांपुर्वी हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस प्रशासन योग्य दिशेने तपास करत नसल्याच्या निषेधार्थ मयत पोले यांच्या नातेवाईकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. गुरूवारी पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
मयत सर्जेराव पोले यांचे भाऊ कृष्णराव पोले यांच्यासह इतर नातेवाईकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलीस प्रशासनातील अधिकारी योग्य दिशेने तपास करत नाहीत असा आरोप करत उपोषणकर्त्यांनी निषेधही नोंदविला. या उपोषणात कुटूंबातील महिला, पुरूष, मुला-बाळांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान, पोलीस अधिक्षक यांनी या गुन्ह्याबाबत विशेष पथक रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपीचा शोध घेवू असे 26 जुलै रोजी लेखी पत्राद्वारे आश्वासित केले.
हे उपोषण सोडविण्यासाठी आ. रामराव वडकुते, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राम कदम, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, बी.डी.बांगर यांनी मदत केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी कुटूंबियांची मागणी लक्षात घेत लवकरच आरोपींना अटक करू असे सांगितले.
No comments:
Post a Comment