संग्राम मोरे
नविन नांदेड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या आंदोलनकांना आडवल्यानंतर नांदेड लगतच्या आमदुरा येथे जबरदस्त दगडफेक करण्यात आली. त्याचे पडसाद लगतच्या पुणेगावात उमटल्यानंतर पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर व रबरी गोळयााचा पाच वेळा गोळीबार केला. दगडफेकीत तब्बल 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले आंदोलकांनी पोलिसांच्या चार वाहनासह तहसीलदार तसेच 20 ते22 दुचाकी वाहनांचे तोडफोड केली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज अमदुरा येथे काही तरूंणानी गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 11 च्या सुमारास काही तरूण जलसमाधी घेण्यासाठी निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी अडवल्यानंतर तेथे बाचाबाची झाली. पोलीस व आंदोलक आपआपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने वाद वाढला. त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी सुरूवातीला लाठीमार केला. परंतु त्यानंतरही जमाव आक्रमक होत असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या.
एकीकडे आमदुरामध्ये हा गोंधळ सुरू असतांना पुणेगांव येथेही प्रचंड दगडफेक सुरू झाली. लगत असलेल्या या दोन गावातील परिस्थिती हाताळण्यासाठी शेवटी पोलिसंानी बळाचा वापर केला. आमदुरा व पुणेगांव येथून घोषणाबाजी करत नदीच्या दिशेने मोठा जमाव येत असतांना पोलिसांनी रबरी गोळयाचा गोळीबार केला. यासंपुर्ण घेटनेत 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर अन्य तिघे जखमी आहेत. जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असली तरी धोक्याबाहेर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले. जखमीची नावे अशीः गजानन वैजनाथ वसमतकर (वय 48), मारोती आनंदराव पवार (32), कुणाल काचंडेकर (35), निलेशसाहेबराव थोरात (31), लोभाजी वाघमारे (29), बळवंत बिरादर (52), एकनाथ संभाजी कुरे (35), खांबराव वानखेडे (40),निवृत्ती केशवराव केंद्रे (42),सय्यद खाजा सय्यद मुनीर (57), आशिषकुमार माने (28), नामदेव शामराव मोरे (28), एकनाथ संभाजी खुरे (30), रूपेश मगर (30), ज्ञानोबा व्यंकटराव पुरी (23) व शिवानंद बालाजीराव हंबर्डे (23) हे जमीख झाले आहे.
नांदेड व मुदखेड तालुक्यात असलेली पुणेगांव व आमदुरा ही गावे पोलिसांच्या दफ्तरी संवंदनशील आहेत. कोणाताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फोैजफाटा पोलिसांनी तैनात केला होता. परंतु मोठया प्रमाणावर दगडफेक सूरू झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. या घटनेत 20 ते 22 दुचाकी वाहनांसह पोलिसंाच्या चार गाडया तसेच तहसीलदाराच्या गाडीची नासधुस करण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी आता समाजकंटकाची धरपकड करण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. या दोन्ही गावात तणावपुर्ण शांतता आहे.
आज याच मागणीसाठी नरसीफाटा, उमरी, धर्माबाद याठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. अर्धापूर येथे रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान पोलीस व आंदोलकामध्ये शाब्दीक संघर्ष उडाला परंतु तेथील आंदोलन शांततेत पार पडले.
मराठा समाजाच्या भावनेचा बांध सुटला आहे. त्यामुळेच राज्यामध्ये आरक्षण प्रश्नावरून रान उटले आहे. आमदारांनी राजीनामे देण्यापेक्षा शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला. तर दबावाखाली आरक्षणाचा प्रश्न मिटेल. त्यामुळेच शिवसेने सरकारचा पाठिंबा काढावा असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. विश्रामगृहावर मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिंधीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. यावेळी आ.डी.पी.सावंत, आ. अमर राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती हेाती.
No comments:
Post a Comment