नांदेड/प्रतिनिधी- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर आंदालन पेटले असताना नांदेडचे पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांची औरंगाबाद येथे उपायुक्तपदावर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
राज्यातील 95 उच्च पदस्थ पोलीस अधिकार्यांच्या शुक्रवार दि. 27 जुलै रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये नांदेड पोलीस पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांची औरंगाबादचे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नांदेडच्या पोलीस अधिक्षकपदी नवी मुंबई शहरचे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत भारतीय पोलीस सेवेतील संजय जाधव यांची नियुक्तीचे आदेश राज्याचे गृह उपसचिव कैलास गायकवाड यानी जारी केले आहेत. पोलीस अधिक्षक मीणा यांच्यासह जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांची देखील बदली करण्यात आली असुन त्यांचें जागेवर अक्षय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment