मराठा आरक्षणासाठी नांदेड येथे आत्महत्येचा प्रयत्न

Saturday, July 28, 2018



नांदेड/प्रतिनिधी- मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चांगलाच चिघळत असून औरंगाबादच्या दुर्देवी घटनेनंतर नांदेडच्या पिंपळगाव  (म.)  येथील एकाने गळफास घेवून आपली खदखद मुंख्यमंत्र्याच्या नावे चिठ्ठी लिहुन व्यक्त केली आहे.

येथील पिंपळगाव (म.) येथील एका मराठा समाजातील वारकरी संप्रदायाच्या गृहस्थाने मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याची आपल्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या  पत्रात सांगितले आहे. पिंपळगावचे प्रल्हाद कल्याणकर वय 54 वर्षे यांनी शुक्रवार दि. 27 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजता आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी गजाला साडीच्या सहाय्याने  गळफास घेतला परंतू लोखंडी गज वाकल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला. 

सदर घटना कुटंबियांच्या लक्षात आल्याने पूढील अनर्थ टळला असला तरी कल्याणकर यांना एका खाजगी इस्पितळात उपचार चालू असुन त्यांची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नसल्याचे कळते.
या घटनेची माहिती पसरताच परीसरात त्याचे पडसाद उमटले असून आंदोलनकांनी नांदेड अर्धापुर मार्गावर प्रचंड घोषणाबाजी करीत रास्तारोको केला. या दरम्यान दगडफेकी करण्यात आल्याने काहीकाळ यामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

No comments:

Post a Comment