बसवेश्वर शिक्षण संस्थेवर बिडवे गटाचे वर्चस्व

Sunday, July 29, 2018
 


 लातूर / प्रतिनिधी
शहरातील नामांकित श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत शिवशंकर मल्लिकार्जुन बिडवे यांच्या नेतृत्वातील पॅनल विजयी झाले असून मागच्या अनेक वर्षापासून अंतर्गत गटबाजीने त्रस्त असणराया या संस्थेवर बिडवे गटाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. 

        श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक रविवारी पार पडली. धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत शिवशंकर बिडवे यांच्या नेतृत्वातील आणि ऍड. सांबप्पा गिरवलकर यांच्या नेतृत्वातील पॅनलमध्ये लढत झाली. निवडणुकीसाठी एकूण 47 मतदारांपैकी 46 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. देशिकेंद्र हायस्कूल या ठिकाणी सकाळी 10 ते 2 या वेळेत मतदान पार पडले. त्यानंतर दुपारी 3 वजता मतमोजणी करण्यात आली. 
विजयी उमेदवार 
कार्यकारी मंडळात अध्यक्षपदासाठी शिवशंकर मल्लिकार्जुन बिडवे यांना 27 मते अन्‌ ते विजयी ठरले. उपाध्यक्ष सिद्रापप्पा आलूरे 27 सदस्य, काशिनाथ गुणवंतप्पा साखरे 27, मन्मथ मल्लिकार्जुन येरटे 25, प्रभुप्पा शिवलिंगप्पा पटणे 26, शिवशंकर वैजनाथ खानापूरे 26, बसवेश्वर मल्लिकार्जुनप्पा बिडवे 26 आणि सुभाषचंद्र काशीनाथ मांडे 27 




पराभूत पॅनल 
कार्यकारी मंडळ निवडणुकीत ऍड. सांबप्पा त्रिंबकप्पा गिरवलकर यांचे पॅनल पराभुत झाले. या पॅनलला मिळालेली मते पुढील प्रमाणे ऍड. सांबप्पा गिरवलकर 19, माधवराव हनमंतराव पाटील 19, ऍड. गंगाधर विठ्ठलराव कोदळे 18, कांतराव एकनाथराव बुके 21, ऍड. श्रीकांत तमणप्पा उटगे 20, सौ. ललिताबाई  हावगीराव पांढरे 18, अशोक शरणप्पा उपासे 21 आणि प्रदिप विश्वनाथप्पा दिंडीगावे 21 मते मिळाली. 
     महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संस्था कोणाच्या ताब्यात जाणार यावरून उत्सुका होती. त्या दृष्टीने निवडणुक स्थळी दोन्ही पॅनलचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकाल लागल्यानंतर उपस्थित बिडवे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 

No comments:

Post a Comment