अविश्वास दाखल केल्याने अहमदपुरात खळबळ, कमळाला ग्रहण

Sunday, July 29, 2018



अहमदपूर दि प्रतिनिधी अहमदपूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून अविश्वासाचे राजकारण चालू आहे ज्यात न.प पाठोपाठ पंचायत समितीच्या उपसभापती विरोधात पण अविश्वास दाखल केला या अविश्वासाने अहमदपूर राजकारणात खळबळ माजली आहे . एकंदरीत अहमदपुरात कमळाला ग्रहण लागले आहे 

पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती मंगलाबाई खंदाडे यांच्या विरोधात 6 पंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
अहमदपूर पंचायत समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे सभापती श्रीमती अशोक केंद्रे आहेत अहमदपूर पंचायत समितीवर आमदार विनायकराव पाटील म्हणजे भाजपचा झेंडा आहे अहमदपूर तालुक्यात भाजप अंतरंगत 5 ते 6 गट आहेत. 

आ विनायकराव पाटील यांच्याकडे कोणतीही संस्था नाही अशा परिस्थितीत आमदार होण्याचं स्वप्न सर्वांना पडायला हरकत नाही पण पक्ष खिळखिळा केल्याने काय होईल सांगता येत नाही. अहमदपूर पंचायत समिती मध्ये ऐकून 12 सद्स्य आहेत या पैकी 6 सदस्यांनी अविश्वासच्या ठरावा वर सह्या केलेल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात अहमदपूर नगर पालिका उपाध्यक्षा मीनाक्षी ताई रेड्डी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांच्या कडे 19 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अहमदपूर नागरपरिषदेत ऐकून 23 सदस्य आहेत .जिल्हाधिकारी यांनी अविश्वाचा ठराव नगरक्षकडे पाठवला आहे . अहमदपूर न प उपाध्यक्ष व प.स. उपसभापती यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावांनाने खळबळ माजली आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment