आमदाराची गाडी पेट्रोल टाकूण जाळण्याचा प्रयत्न

Thursday, July 26, 2018

हिंगोली / प्रतिनिधी

कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आ. संतोष टारफे यांच्या इनोव्हा चारचाकी गाडीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 25 जुलै रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास करण्यात आला. रात्रीच घटनास्थळी पोलीसांनी भेट देवून याबाबतची अधिक तपास सुरू आहे. 

हिंगोली शहरातील नाईक नगर भागात कॉंग्रेसचे आमदार संतोष टारफे राहतात. नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर इनोव्हा क्र. एमएच 38 व्ही. 8008 या चारचाकी गाडी उभी होती. 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञातांनी या गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही बाब शेजारी असलेल्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ हा प्रकार आ. संतोष टारफे यांना सांगितला. त्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेत ही गाडीला लागलेली आग विझविली. यामुळे गाडीतील मध्यभागाचे नुकसान झाले आहे. तसेच बाहेरील दरवाजावरही धुराचे डाग पडले आहेत. घटनास्थळी रात्री शहर पोलीसांनी भेट दिली असून आ. टारफे यांच्या घरासमोर व परिसरातील सिसिटीव्ही फुटेजवरून पुढील तपास सुरू आहे. 

खोडसाळपणातून हा प्रकार- आ. टारफे

कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हा खोडसाळपणा केला आहे. गाडीने पेट घेतला आहे ही बाब शेजाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही गाडी विझविली. या घटनेत गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून रात्रीच शहर पोलीसांनी भेट देवून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच याबाबत कोणतीही तक्रार दिली नसल्याचे आ. टारफे म्हणाले.

No comments:

Post a Comment