लातूर, दि. १६ -’लायनेस क्लब ऑफ लातूर’ तर्फे जि.परिषद शाळा खाडगाव येथे पहिली ते सातवी पर्यन्त असलेल्या, शाळेत व वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या,विद्यार्थ्याचा सत्कार प्रमाणपत्र देवुन करण्यात आला.तसेच विद्यार्थ्याना क्लब च्या उपाध्यक्षा प्रमिला पाचेगावकर यांच्या तर्फे खाऊ वाटप करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्याना डॉ.प्रभा वाडकर व एड.राजनी गिरवलकर यांनी मार्गदर्शन केले .प्रास्ताविक लायनेस अध्यक्षा डॉ.उमा मिरजगावे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली किनीकर यांनी केले.आभार क्लब च्या सहसचिव प्रा.संजयादेवी गोरे यांनी मानले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कपाळे इंदुमती, लायनेस सदस्या अर्चना मिरजगावे,सुरेखा कोरे,ज्योती हालिंगे, सुवर्णा महाजन,एड.किरण पाटील,सुरभि बजाज,मंदाडे,सावळे व बिराजदार सर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment