नरेंद्र मोदीयांच्या सभेदरम्यान दुर्घटना !

Monday, July 16, 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  सभेदरम्यान मंडप कोसळला 22 जखमी 
मिदनापूर - 
मिदनापूर पश्चिम बंगाल च्या मिदनापूर येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान दुर्घटना घडली मुसळधार पावसामुळे येथे लावण्यात आलेला मंडप कोसळून २२ लोक जखमी झाले आहे त तातडीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले सभा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जखमींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालय गाठले तेथे त्यांनी जखमींना भेटून आस्थेवाईक चौकशी केली 

सभास्थळी मुख्यप्रवेशद्वाराजवळ तंबू उभारले होते पावसापासून सरंक्षण व्हावे या साठी तंबू उभारले होते अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार अनेक उत्साही कार्यकर्त्यानी तंबूत गर्दीत केली त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद मोदी आपल्या भाषणात त्यांना काळजी घेण्याचे आव्हान करत होते पंतप्रधानांनी तंबू कोसळत असल्याचे पहिले आणि जवळच उभारलेल्या एस पी जी कर्मचाऱ्यांना तात्काळ जखमींना मदत करण्याच्या  सुचना दिल्या. 
त्याच वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी काही डॉक्टर आणि एस पी जी चे जवान यांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मिदनापूर दौऱ्यावर होते येथे त्यांनी सभेत शेतकऱ्याच्या मुद्यावर राज्यसरकार व विरोधी पक्षावर जोरदार हल्ला केला  पंतप्रधान सभेदरम्यान 
मुसळधार पाऊस सूरु  होता . पंतप्रधानाचे भाषण संपण्यापूर्वीच एक मंडप कोसळला परिणामी २२ लोक जखमी झाले. 
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment