औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित लातूर कॉलेज ऑफ बी.फार्मसी अभ्यासक्रमाचा उन्हाळी परीक्षा २०१८ चा निकाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्फत जाहिरात झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रति वर्षा प्रमाणे या वर्षीही उज्जवल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन करून महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल बी.फार्मसी तृतीय वर्ष १००%, द्वितीय वर्ष ९६% व प्रथम वर्ष १००% लागाला असून विशेष प्राविण्यात ४३ तर प्रथम श्रेणीत ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. .
प्रथम वर्षातून कांबळे अंजली व कुलकर्णी श्वेता या विद्यार्थीनीने ८.८८ CGPA गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कोलसुरे जयश्री ८.६३ CGPA गुण मिळवून व्दितीय तसेच सौदागर अंजुम ८.५३ CGPA गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.महाविद्यालयातून द्वितीय वर्षांतून नांदलवार प्रतीक्षा ९.५१ CGPA गुण मिळवून प्रथम तर मुसणे तृप्ती ९.४४ CGPA गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला तसेच बरिदे पुनम ९.२९ CGPA गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयातून तृतीय वर्षांतून सौदागर अकलाख ९.४५ CGPA गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर धाराशिव अंकिता ९.४३ CGPA गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला तसेच जाधव गितांजली ९.३९ CGPA गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.
महाविद्यातील उज्जवल यशाची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यनी घेतलेल्या मेहनतीचे फलित विद्यार्थ्यांनी या निकालातून दाखवून दिले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, प्राध्याकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री भिमाशंकरअप्पा बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,सचिव श्री वेताळेश्वर बावगे, लातूर कॉलेज ऑफ बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.श्री श्रीराम पेठकर लातूर कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे,,राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक,हासेगावचे प्राचार्य श्री संतोष मेतगे यांनी विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment