ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतला बीड जिल्हयाच्या विविध विकास कामांचा मॅरेथॉन आढावा
कामांना गती देण्यासाठी अधिका-यांना करून दिली आखणी
बीड दि. २१ -------बीड जिल्ह्याला गेल्या तीन साडे तीन वर्षात आपण पालकमंत्री या नात्याने विकासकामांना पुरेसा निधी खेचून आणला आहे. या निधीमुळे जिल्ह्यात रस्ते,पाणी, रेल्वे,जलयुक्त शिवार, स्वछता, आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला असून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे .आता पुढील काळात विकासास गती देण्यासाठी त्यांनी आज अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाचे नियोजन स्वतः करून दिले. दरम्यान, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग २०१९ पर्यंत कसल्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असा विश्वास त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा खातेनिहाय मॅरेथॉन आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आ. संगीताताई ठोंबरे, जिल्हाधिकारी एम .डी .सिंह ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते .
पीकविमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीत जिल्हयाचा गौरव देशात झाला. त्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. मागच्या पाच वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात एक हजार टँकर लावून पाणीपुरवठा केला जात होता .मात्र आपण सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे बीड जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसून जिल्हा टँकरमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि आज जिल्ह्यात केवळ बारा टँकर सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. आपण पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर ,रस्ते पाणी ,वीज , या पायाभूत सुविधांसोबतच स्वच्छता आणि ग्रामविकासावर भर दिला. जिल्ह्यात २०१४ पर्यंत केवळ तीस टक्के लोकांकडे शौचालय होते. पण आता जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक शौचालय उभारण्यात आले आहेत. यापुढील काळात जिल्ह्यातील सर्व गावात सांडपाणी निस्सारण असेल यादृष्टीने काम करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या व जिल्ह्यात घर तेथे शोषखड्डा करण्याचे त्यांनी सुचवले. याचबरोबर बीड जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्यास आरोग्य विभागास सूचनाही त्यांनी दिल्या . जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर अखेर पर्यंत मोतीबिंदू मुक्त जिल्हा करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने महाआरोग्य शिबीर आयोजित केले जाणार असून यात रुग्णांची तपासणी,आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
जिल्हयाचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद इमारतीस
ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही इमारत सत्तर टक्के बांधून पूर्ण झाली आहे तर बीड जिल्ह्यातील अकरा ही पंचायत समितीच्या इमारती जुन्या झाल्या होत्या . त्याही मंजूर केल्या त्यासाठी निधी दिला यातील काही इमारती पूर्ण होऊन त्यात कामकाज सुरू झाले असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग होत आहेत .यातील औरंगाबाद सोलापूर महामार्गाची बीड जिल्हयातील लांबी ७८ किमी आहे व या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आला असून दहा जुलै पासून वाहतूकीस खुला होईल असेही त्यांनी सांगितले.
२०१९ पर्यत रेल्वे धावणारच
अवैध धंद्याविरूध्द मोहीम उघडण्याचे पोलिस प्रशासनाला आदेश
नियोजनाची करून दिली आखणी
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment