खून प्रकरणातील आरोपी पाच महिन्यानंतर पोलिसांच्या हाती

Thursday, June 21, 2018


स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कार्यवाही 
हिंगोली / प्रतिनिधी.
गळा आवळून खून केल्याप्रकरणी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मयत गंगाधर गोविंदराव राखोंडे खून प्रकरणात सहा महिन्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने आपल्या तपासाची सूत्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी (दि.१९) एका आरोपीला अटक केली आहे. 
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे गंगाधर गोविंदराव राखोंडे यांचा त्यांच्याच घरात गळा आवळून खून करून जाळण्यात आले होते. सदर घटनेप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेला घडलेल्या या घटनेत कलम ३०२, २०१ भादंवि अन्वये अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी मयत गंगाधर राखोंडे यांचा मोबाईल आढळला नव्हता, हा मोबाईल नेमका कुणाकडे आहे याचा पोलीस कसून तपास घेत असतांना डिग्रस येथील त्या मयताचा हा मोबाईल गावातीलच अमोल सोपान कऱ्हाळे यांच्याकडे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली..

पोलिसांनी अमोल सोपान कऱ्हाळे यांना विचारल्यानंतर त्यांनी हा मोबाईल डिग्रस कऱ्हाळे येथीलच नामदेव ज्ञानदेव सूर्यवंशी उर्फ ठाकूर यांच्याकडून चोरला असल्याचे सांगितले. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे नामदेव सूर्यवंशी यांच्या दिशेने फिरवली. नामदेवला विचारताच हा मोबाईल मयत गंगाधर राखोंडे यांचाच असल्याचे सांगत गुन्हा कबुल केला. मयत गंगाधर राखोंडे यांचा खून हा डोक्यावर लाकडाने मारून गळा आवळून करत जाळून टाकल्याचे आरोपीने सांगितले. .

मोबाईल व पैसे घेवून आपण गेलो असे ही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेवून हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार व त्यांचे सहकाऱ्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याकामी आपली मोहिम फत्ते केले. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.डी.थोरात हे काम पाहत आहेत..

No comments:

Post a Comment