वीज अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, June 21, 2018

केदारकुंठा येथील घटना

देगलूर ता.२१
स्वतःच्या शेतात काम करीत असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसात शेतात थांबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथून जवळच असलेल्या केदारकुंठा शिवारात गुरुवारी (ता.२१) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, केदारकुंठा येथील शेतकरी मारोतीराव केशवराव बाराहाळे (वय ६०) हे स्वतःच्या शेतात काम करीत असताना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसात बाराहाळे हे शेतात थांबले असता अचानक अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment