मुंबई दि
अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला.व विजयश्री खेचून आणला
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. कोणत्याही परिस्थितीत डावखरेंचा पराभव करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

No comments:
Post a Comment