नगर परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद

Friday, June 29, 2018

वसमत / प्रतिनिधी 
वसमत शहरातील शुक‘वार पेठ भागात आसलेल्या नगर परिषद नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे आरोग्य केंद्र बंद स्थितीत आहे. यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देवून पुर्ववत सुरू करावे अशी मागणी पुढे येत आहे. 
  
वसमत शहारातील शुक‘वार पेठ भागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. लोमटे यांनी गत अनेक दिवसांपुर्वी न.प कडे राजीनामा दिला तेव्हापासुन आरोग्य केंद्र बंद आहे. वैद्यकीय आधिकार्यांनी राजीनामा देण्याआधीही आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चालत होता. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांची जागाच रिक्त असल्याने आरोग्य केंद्र बंद आहे.

 यामुळे या भागातील रुग्णांना रुग्ण सेवेस मुकावे लागत आहे. प्रशासनाने अद्यापही या आरोग्य केंद्राकडे लक्ष दिले नसल्याने नागरिकात संताप व्यक्त केल्या जात असुन सदर आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी नागरीकांतून होऊ लागली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment