दहा दिवसांआड होणार लातूरला पाणीपुरवठा.

Tuesday, December 18, 2018


लातूर :
मांजरा धरणात अल्प पाणीसाठा असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या लातूर शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले. 


सध्या धरणात मृत साठ्यात ३५ दलघमी पाणीसाठा आहे. या पाण्यावर लातूर शहर, लातूर एमआयडीसी, कळंब, अंबाजोगाई, केज, धारूर, युसूफ वडगाव येथे पाणी पुरवले जाते. त्याचबरोबर धरण परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उसासाठी पाणी उपसा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार मांजरा धरणात सध्या उपलब्ध असलेले पाणी जून महिन्यापर्यंत पुरवले जाऊ शकते. 

सध्या लातूर शहराला आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आता शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या लातूर शहरात पाणीटंचाई नाही. सहा सात वर्षांपासून लातूर शहराला कायम आठ दिवसाआड एकदाच पाणी पुरवले जात आहे. आठ दिवसांला पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या साठवणुकीची व्यवस्था नागरिकांकडून केली जाते. आता दहा दिवसाआड एकदा पाणी येणार असले तरी शहरात त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment