गोंदियात बिबट्याची गोळ्या घालून शिकार

Tuesday, December 18, 2018
गोंदिया : जिल्ह्यातील गोठनगाव वन परिक्षेत्राच्या केळवद शिवारात अज्ञातांनी मादी बिबट्याची शिकार केली आहे. शिकाऱ्यांनी बिबट्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोळ्यांच्या मधोमध, एक फुप्फुसात सापडली, तर तिसरी गोळी शोध घेऊनही सापडली नाही.



शिकाऱ्याने चारही पायाचे पंजे कापून नेले. दोन डोळ्यांच्या मधोमध मारलेली गोळी पाहता हे एखाद्या शार्पशूटरचे काम असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ झाल्यानंतर अशा प्रकारे गोळ्या घालून बिबट्याची शिकार करण्यात आल्याची गेल्या ४२ वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी दिली.

केळवद गावाच्या मामा तलावाशेजारी रविवारी मृतावस्थेतील बिबट्या एका शेतकऱ्याला दिसून आला. त्यानंतर शेतकऱ्याने ही माहिती गोठनगाव वन विभागाला व अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील घटनास्थळी दाखल झाले. या वेळी मृतावस्थेतील बिबट्याच्या पायाचे चारही पंजे कापून नेल्याचे दिसून आले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment