अहमदपूर दि.
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित,वंचित उपेक्षित,पिडीत सर्वसामान्यांना आपल्या संविधानाच्या माध्यमातून आधार दिला असून त्यांची कृतज्ञता प्रत्येकांनी व्यक्त करणे आवश्यक आहे.शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे अहमदपूर शहराचे भूषण असून या पुतळ्याच्या सूशोभीकरणासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल असे प्रतिपादन आमदार विनायकराव पाटील यांनी केले.
या वेळी पुतळा समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी बोलताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सूशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे असून कूठल्याही निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती हे विशेष.
या वेळी दिगांबर गायकवाड यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक अरूणभाऊ वाघंबर यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एम.एन.क्षिरसागर यांनी केले तर आभार पत्रकार सत्यपाल वाघमारे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीकांची उपस्थिती होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment