चंदीगड - कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे आधीच होती, असा गौप्यस्फोट रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजीतसिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याची टीका आतापर्यंत केली जात होती; परंतु आता रॉच्या माजी प्रमुखांनीच त्यावर भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्यावेळी दुलत हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होते. चंदीगडमध्ये सैन्य साहित्य महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावर भाष्य करत आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली होती. युद्धापूर्वीच आम्ही अडवाणींना ही माहिती दिली होती, असे ते आता म्हणाले आहेत.
या कार्यक्रमाला निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, रॉचे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर उपस्थित होते. या तिघांनीही दुलत यांच्या मताशी सहमती दर्शवत गुप्त माहिती जास्त काळ ठेवून चालत नाही. त्यावर त्वरित योग्य कारवाही व्हायला हवी, असे मत व्यक्त केले.
जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पूर्वमध्ये रोज होणारे ऑपरेशन केवळ 30 टक्के गुप्त माहितीच्या आधारे होतात. कोणीही संपूर्ण गुप्त माहिती येईपर्यंत थांबू शकत नाही,’ असे लंगर यांनी सांगितले, तर प्रत्येक अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणांवर फोेडून चालणार नाही, हे व्यवस्थेचे अपयश असते,’ असं डावर यांनी स्पष्ट केले. भारतीय व्यवस्थेत सर्व गुप्तचर यंत्रणांची सूत्रे एखाद्या व्यक्तिच्या हाती असणे आत्मघाती ठरू शकते, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाक लष्कराच्या हातचे बाहुले आहेत काय? असा सवाल दुलत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी इम्रान यांना आपण अजून वेळ दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
लापरवाहीची देशाला मोजावी लागली किंमत
कारगिल जिल्ह्यातील द्रास सेक्टरमध्ये हे युद्ध झाले. पाकिस्तानी सैनिक सीमेवरचा पर्वत चढून भारतीय हद्दीत आले. त्याची माहिती अगोदर मेंढपाळांनी दिली, तरी सरकारने लवकर दखल घेतली नाही, असे सांगितले जात होते. आता दुलत यांच्या आरोपामुळे गुप्तचर विभागाला मिळालेली माहिती सरकारला कळवूनही वेळेवर कारवाई झाली नाही, असे स्पष्ट दिसते. त्याची मोठी किमंत देशाला मोजावी लागली. पाकिस्तानी लष्कराची ही घुसखोरी मोडून काढण्यासाठी साडेपाचशे जवान, लष्करी अधिकारी प्राणाला मुकले. आता अडवाणी यांना माहीत असूनही वेळीच उपाययोजना केली नाही, असा ठपका ठेवण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अडवाणी यांना दूर ठेवण्यासाठी कोलित हवेच होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment