हत्ता येथे गोवर-रुबेला लसीकरण

Saturday, December 22, 2018


हिंगोली / प्रतिनिधी
जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील हत्ता ना. येथील महाकाली माध्यमिक व गजानन प्राथमीक आश्रमशाळा येथे गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत बालकांना गोवर व रुबेलाची लस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली. 


या लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डी.व्ही.राठोड, मुख्याधिकारी श्रीमती एस.के. पवार तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षक श्रीमती शुभांगी खिलारे , जिल्हा सुपरवायझरअशोक जोशी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आशासेविका यांची उपस्थिती होती. गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 9 ते 15 वयोगटातील 3 लाख 18 हजार 230 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून आजपावेतो सुमारे 2 लाख 27 हजार बालकांना लस देण्यात आली आहे. सदर मोहीम दीड महिना राबविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment