Saturday, December 22, 2018December 22, 2018
कळमनुरी/प्रतिनिधी
हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरीजवळ सातव महाविद्यालयाच्या समोर दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये ट्रक महामार्गावर आडवा झाल्यामुळे पाच तास वाहतुक ठप्प पडली होती.
सातव महाविद्यालयाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. ट्रक क्र.एमएच 20 डीई 8177 हा हिंगोलीकडून नांदेडकडे तर ट्रक क्र. एचआर 58 बी. 7324 हा नांदेडकडून हिंगोलीकडे येत असताना जोरदार धडक झाली. धडक एवढी जोराची होती की, एक ट्रक महामार्गावरच आडवा झाला. तसेच ट्रकची मागील व पुढील चाके उखळली. दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतू, अपघातानंतर या महामार्गावर जवळपास 15 किलोमीटरपर्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागले. अखेर पोलीस उपाधिक्षक बी.बी.मुदिराज, पोनि. राहिरे व वाहतुक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी आडवा झालेला ट्रक बाजुला केल्यानंतर तब्बल पाच तासानंतर ही वाहतुक सुरळीत केली.
हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अपघात
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment