चावलवाला बाबा रमणसिंहांच्या साम्राज्याला हादरा

Tuesday, December 11, 2018


रायपूर : ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. मात्र ही ताकद अपुरी पडल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.या बाबांची भाजपा पराभुत झाली आहे . . 90 जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 62 तर भाजपा 18 जागांवर  तर इतर १० आघाडीवर आहे.

राज्यातील जनमानसात आमची प्रतिमा चांगली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल. छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे, असा दावा निकालापूर्वी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी केला होता, मात्र हा दावा खोटा ठरताना दिसून येत आहे.

90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला 39 जागा तर बसपाला एका जागेवर विजय मिळवता आला होता. गेल्या 15 वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या वेळी भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 तर बसपला चार टक्के मते मिळाली होती.

No comments:

Post a Comment