पराभव होणार हे माहितच होतं: खा काकडे

Tuesday, December 11, 2018

पुणे : छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होणार हे आम्हाला आधीच माहिती होतं, असं आश्यर्यकारक विधान खा संजय काकडे यांनी केलं आहे . काकडे हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत .मध्यप्रदेशातील निकाल अनाकलनीय आहे असंही ते म्हणतात .

छत्तीसगडचा गड भाजपला राखता आला नाही. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर भाजपने गड गमावला असून त्यांना अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला ६ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. भाजपचा पराभव झाल्यानंतर संजय काकडे म्हणाले, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला पराभव सहन करावा लागणार हे आम्हाला आधीच माहिती झाले होते. परंतु, मध्य प्रदेशात काँग्रेसला जे यश मिळाले ते आमच्यासाठी आश्चर्यकारक असेच आहे.

No comments:

Post a Comment