पवार साहेब फसवा फसवी करू नका : उदयनराजे

Saturday, September 22, 2018

सातारा दि प्रतिनिधी 
राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. आज सकाळी शरद पवार आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.  यावेळी काय चर्चा झाली याबाबतचे सांगणे उदयन राजेंनी टाळले असले तरीही उपरोक्त सूचक विधान केले. 

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काही प्रमाणात तेढ निर्माण झाले होते. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना उदयन राजे सोडून इतर सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष साताऱ्यावर केंद्रीत झाले होते. आज उदयन राजेंनी पवार यांनी भेट घेतली. 

No comments:

Post a Comment