मुंबई : जगातील सर्वात मोठे . नेटवर्क असलेल्या जिओने भारतातील आघाडीचा प्रसारक स्टार इंडियाशी पाच वर्षे भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे क्रीडा मनोरंजन क्षेत्रात नवे पर्व सुरू होत आहे. जिओ आणि स्टार भारताचे दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणारे सर्व क्रिकेट सामने जिओ टीव्ही आणि हॉटस्टारवर उपलब्ध करून देणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने याबाबत स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला आहे. क्रिकेट प्रसारक, ्ट्रिरमिंग प्लॅटफॉर्म आणि हायस्पीड डेटा नेटवर्क प्रथमच एकत्र येऊन अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट कंटेंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देतील..
जिओ आणि स्टार यांनी अनेक क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला असून, यात ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. याविषयी जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, जिओ अतिशय विशेष असा कंटेंट ग्राहकांना जिओ टीव्ही ॲपच्या माध्यमातून देत आहे. भारत क्रिकेट केवळ खेळले जात नाही, तर तो धर्म बनला आहे. प्रत्येक भारतीयाला चांगल्या क्रीडा स्पर्धा पाहता यायला हव्यात तसेच कंटेंटची गुणवत्ता चांगली असण्यासोबत बॅण्डविड्थही पुरेशी असायला हवी. या भागीदारीमुळे वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आपण उत्कृष्ट क्रीडा स्पर्धा आणि चांगल्या डिजिटल पायाभूत सुविधा जिओ ग्राहकाला देत आहोत. क्रीडा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआर), व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि इतर क्षेत्रांत ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्याचे वचन जिओने दिले असून, त्या दिशेने कंपनी काम करत आहे..

No comments:
Post a Comment