लातूरवर जलसंकट; पाटबंधारे विभाग झोपा काढते काय?

लातूर : प्रतिनिधी
पाणी काटकसरीने, जपून वापरा, नळाला तोट्या बसवा असे हितोपदेश एकिकडे नागरिकांना दिले जात असतांना, आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या लातूर शहरावर पाण्याचे संकट गडद होत आहे. पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष, ढिसाळ नियोजनाने मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी सायंकाळच्या सुमारास फु टली अन् करोडो लिटर. पाणी वाया गेले. लातूर-कळंब रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. या जलवाहिनीची देखभाल करणारे अधिकारी झोपा काढतात काय? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असणार्या लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. हे धरण सन 2016 आणि सन 2017 मध्ये 100 टक्के भरले होते. चालू वर्षी अर्थात सन 2018 मध्ये निसर्गाच्या अवकृपे धरणात पाणी आले नाही. एकदा धरण 100 टक्के भरले तर किमान तीन वर्षे सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो असे तत्कालीन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी म्हटले होते. मात्र लागोपाठ दोन वर्षे मांजरा धरण 100 टक्के असूनही पाणी गेले कुठे? अशी विचारणा शहरातील नागरिकांकडून होत आहे.
मांजरा धरणातून कळंब-लातूर रस्त्याच्या कडेने लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. रविवार सायं.5 वाजता सुमारास जोडजवळा गावाजवळ सदरील जलवाहिनीला अचानक भगदाड पडले आणि 100 फु ट उंच, फ वार्याने त्यातून पाणी रस्त्यावर वाहू लागले. जवळपास दिड तास हे पाणी बाहेर फे करे गेले. जलवाहिनी फु टल्याने त्या परिसरात आणि लातूर कळंब रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. त्यानंतर धरणातून होणारा पाणीपुरवठ थांबवण्यात आला. संबंधित अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, पाण्याची नासाडी झाली. लातूरकरांच्या हक्काचे पाणी तर गेलेच पण त्या परिसरातील शेतजमिनीचेही नुकसान झाले.
आजच्या तारखेत मांजरा धरणात अवघे 35 दलघमी पाणी शिल्लक आहे. धरण मृत साठ्यात आहे. लातूरकरांना पाणी बचतीचे उपदेश दिले जात आहेत. पाणी कपातीची टांगती तलवार लातूरकरांवर आहे. 3-4 महिन्यानंतर पाणी बाणी लागू शकते. अशा रितीने पाच लाख लोकसंख्या असलेले शहर जलसंकटाला सामोरे जात असतांना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी झोपा काढतात काय? असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अक्षम्य दुर्लक्ष आणि ढिसाळ नियोजनामुळेच जलवाहिनी फु टून करोडो लिटर पाणी वाया गेले आहे. लातूरकरांना किमान दोन वेळा पुरवठा होऊ शकते एवढे पाणी वाया गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.
मांजरा धरणावर केवळ लातूर शहरच नव्हे तर एमआयडीसी, केज, कळंब अशा मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. निसर्गाचा लहरीपणा माहिती असूनही सिंचनाच्या नावाखाली मे महिन्यात धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. अक्षरशः तेही पाणी वाया गेले. रविवारी जोडजवळा गावाजवळ जलवाहिनी फु टल्याने त्या परिसरात पुर आल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. जबाबदारी झटकणार्या अधिकार्यांवर शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मांजरा धरण क्षेत्र संबंधित तथा जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करणारे अधिकारी पूर्णतः जबाबदार असून यापुढे तरी अशी घटना होवू नये या करिता काळजी घ्यावी, दक्ष असावे.
ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथून दूरपर्यंत पाणी वाहत होते. बाजूच्या शेतात तर जणू नदीच्या पुराप्रमाणे पाणी जमा झाले आहे. रात्री आठ वाजेपर्यंतही कमी दाबाने पाणी येत होते. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीतून नेहमीच गळती होत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सध्या लातूर शहराला पाणी पुरवठा कमी होत आहे. मांजरा धरणात मृतसाठा असल्याने महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. यावर प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आले आहे. यातच जलवाहिनी फुटल्याने वाहून गेलेले करोडो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून येत आहे.
जोडजवळा नजिक फुटलेल्या जलवाहिनीमुळे शेजारच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ते तातडीने थांबविता आले नाही. जवळपास एक तास उंचावर पाण्याचे फवारे उडत होते. जलवाहिनी फुटल्याची माहिती लातूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मिळताच तातडीने मांजरा धरणावरील पाणी उपसा करणारी मोटार बंद करण्यात आली. मात्र तब्बल एक तास पाणी वाया गेले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंतही जलवाहिनीतील पाणी काही प्रमाणात वाया जात होते. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने गळती दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. यामुळे पाणी पुरवठा बंद आहे.
No comments:
Post a Comment