नवी दिल्ली : घरातील खासगी काॅप्युटर आणि दूरसंचार यंत्रणांवरील डेटातपासणीचा अधिकार राष्ट्रीय तपास संस्थांना देण्याच्या मुद्दायावरून केंद्रीतील मोदी सरकावर मोठी टीकेची झोड उठली आहे. पण आता यूपीए सरकारच्या काळात महिन्याला 9 हजार फोन टॅप करण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रसेनजीत मंडल यांनी ही बाब माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 2013 मध्ये प्रत्येक महिन्याला 7.5 ते 9 हजार फोन आणि 300 ते 500 ई-मेल अकाऊंट्सची तपासणी सरकारच्या आदेशावरून झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
मंडल यांच्या अर्जावर 6 ऑगस्ट 2013 रोजी उत्तर देण्यात आले असून त्यात, सरकारकडून दर महिन्याला 7 हजार 500 ते 9 हजार फोन कॉल्स आणि 300 ते 500 ई-मेल्सची तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतात, असं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.
दूरसंचार कायद्यान्वये अनेक तपास यंत्रणांना फोन कॉल्स आणि ई-मेल तपासण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, असंही एका माहिती अर्जावरील उत्तरात सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
No comments:
Post a Comment