भाजपाला आज पराभूत केलं 2019 मध्ये पराभूत करू.

Tuesday, December 11, 2018



दिल्लीः ही परीवर्तानाची सुरुवात आहे.भाजपाला आज पराभूत केलं 2019 मध्ये पराभूत करु असां दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. हा विजय काँग्रेस कार्यकर्ता, शेतकरी, तरुण आणि व्यापा-यांचा आहे. मी या सर्वांचं अभिंनदन करतो. राज्याच्या विधानसभा निकालानंतर गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आम्ही भाजपाच्या विचारधारेच्या विरोधात आहोत, त्यांचा पराभव करु मात्र भाजप देशमुक्त करणार नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींना टोला लगावला. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या अहंकारामुळे पराभव झाला आहे. मोदींनी 2014 च्या निवडणूका भ्रष्टाचार मुद्दयावर लढल्या मात्र मोदी स्व:त भ्रष्ट आहेत.

राफेल खरेदी आणि नोटबंदीत भ्रष्टचार झाला असल्याचं त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. ईव्हीएम बद्दल जगभरात शंका आहे. आम्ही जनमताचा आवाज ऐकून काम करणार.

No comments:

Post a Comment