लातूर, दि. 21 ः....
प.पू. रमेशभाई ओझा यांची 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर श्रीमद भागवत कथा होत आहे. त्याचे मंडप पूजन लातूर येथील बालाजी मंदीर प्रांगणात गुरुवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नाथ संस्थानचे अध्यक्ष व विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती कथा मुख्य यजमान व आयोजक हरिकिशनजी मालु, तळणीकर यांनी केली आहे.
लातूर येथे प.पू.रमेशभाई ओझा यांची श्रीमद भागवत कथा व्हावी ही अनेकांची इच्छा होती. हा सत्संग श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ हरिकिशनजी मालु यांनी आयोजित केली आहे. खूप दिवसानंतर लातूरात भव्य दिव्या अशाप्रकारचा हा सत्संग आहे. 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर होणार्या या कथेचा वेळ दुपारी 3 ते 6 राहणार आहे.
आणि मंडप व्यवस्था त्या दृष्टिकोणातून गुरुवार 22 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते होणार्या या मंडप पूजनास बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशीही संयोजक व मुख्य यजमान हरिकिशनजी मालू यांनी विनंती केली आहे.भारतातील नामांकीत कथाकारामध्ये प.पू. रमेशभाई ओझा यांचा उल्लेख होतो. आजच्या शुभमूहुर्तावर मंडप पूजन करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment