हिंगोली / प्रतिनिधी :- शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी शहर ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांनी खाजगी वकिलामार्फत तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना बस स्थानक परिसरात गुरुवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी मोहम्मद वसीयोद्दीन याच्या सांगण्यावरून खाजगी वकील काझी नईमुद्दीन सलाउद्दीन याला पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या माणिक स्मारक आर्य विद्यालय समोरील रस्त्यावर तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही, कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, उमर शेख, अभिमन्यू कांदे, संतोष दुमाने, महारुद्र कबाडे, विजयकुमार उपरे, जमीर शेख, प्रमोद थोरात,आवि कीर्तनकार, विनोद देशमुख, गजानन आगलावे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनेरगाव नाका पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तीन महिन्यात तीन पोलीस कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत. कायद्याच्या आणि न्यायव्यवस्थेच्या रखवालदारांना हिंगोलीत बेड्या ठोकल्याने पोलिसदलात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment